Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार ,"जयंत पाटील" यांची मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी

 

संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.--9730 867 448

                        संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार-" जयंत पाटील "यांनी राज्याचे मुख्यमंत्री "एकनाथ शिंदे "यांच्याकडे केली आहे


याबाबत सविस्तर वृत्त असे की 31 ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयानुसार धाराशिव जिल्ह्यातील 3 तालुके दुष्काळी म्हणुन जाहीर केले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील घटलेल्या पर्जन्यमानामुळे भूजल पातळी 1.6 मीटरने मागील 5 वर्षाच्या सरासरीने घसरली आहे. जिल्ह्यातील तळ्यामधील पाणीसाठा 12 % टक्के असुन रब्बी पेरणी गतवर्षीच्या तुलनेत अर्ध्यावर राहिली आहे, शासनाने धाराशिव जिल्ह्यातील 3 तालुके जरी ट्रिगर- 2 लागू असले तरी पिक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, मराठवाड्यात सर्वात जास्त पशुधन असलेला एकमेव धाराशिव हा जिल्हा आहे तथापि जिल्ह्यामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे सबब त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित 5 तालुके सहित पिक व पाण्याची परिस्थिती पाहता संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळी जाहीर करणे बाबत धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष-" संजय पाटील- दुधगावकर" यांनी माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांच्याकडे विनंती केली होती तरी त्या अनुषंगाने संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळी घोषित करावा अशी मागणी जयंत पाटील यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा