Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३

बावडा येथे विजयी सरपंचांनी विरोधातील सरपंचपदाच्या उमेदवाराचा केला सत्कार - हर्षवर्धन पाटील यांनी घालून दिला नवीन आदर्श

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

                             - भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सूचनेनुसार बावडा ग्रामपंचायतच्या भाजपच्या सरपंचपदाच्या विजयी उमेदवार सौ. पल्लवी रणजीत गिरमे यांनी विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचपदाच्या उमेदवार फरजाना साजिद मुलाणी यांचा घरी जावून सन्मान केला. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी घालून दिलेल्या या आदर्श पायंड्यामुळे लोकशाही बळकट होण्यास मदत होणार आहे.

     बावडा येथील विजयी सभेत बोलताना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक म्हंटले की हार-जीत असते, त्यामुळे निवडणुक पार पडल्याने आजपासून सर्वपक्षीय कार्यकर्ते व उमेदवारांनी एकत्रितपणे गावच्या विकासाला हातभार लावावा तसेच नूतन सरपंचांनी विरोधी सरपंचांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करावा अशी जाहीर सूचना केली होती. त्यानुसार भाजपच्या नूतन सरपंचांनी कार्यकर्त्यांसह विरोधी सरपंचपदाच्या उमेदवाराच्या घरी जाऊन हा सत्कार केला. ग्रामपंचायतची निवडणूक संपली आहे, आता गावच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची ग्वाही यावेळी नूतन सरपंच पल्ल्लवी गिरमे यांनी दिली. 

    यावेळी इन्नुस मुलाणी, सत्तार मुलाणी, अमोल घोगरे, स्वप्नील घोगरे, रशीद मुलाणी, रणजीत गिरमे, चंद्रकांत गिरमे, अमर शेटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, सरपंच पल्लवी गिरमे यांनी मंगळवारी निवडणुकीतील अनेक पराभूत उमेदवारांचाही घरी जाऊन सत्कार केला.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा