इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- इंदापूर तालुक्यातील भांडगांव मध्ये रामोशी समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तहसील कार्यालयावर आज बुधवारी दि.०८ नोव्हेंबर रोजी निषेध मोर्चा काढण्यात आला. संबंधित प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी इंदापूर पोलीसात बलात्कारासह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुदाम
रामचंद्र तरंगे (रा.भांडगांव ता. इंदापूर) यास अटक केली आहे. या संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार श्रीकांत पाटील यांना देण्यात आले आहे. यात मोठ्या संख्येने महिलांसह समाज बांधव सहभागी झाले होते. या आंदोलनात शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान सह इतर संघटनांनीही पाठिंबा दर्शवला.
दरम्यान दौलत शितोळे म्हणाले की, राज्यात अशा अनेक घटना घडत आहेत. रामोशी समाजाने या देशात राज्यात माता भगीनींचे रक्षण केले आहे. छत्रपतींचा वारसा आणि विचार घेऊन हा समाज जीवन जगत असताना हा समाज क्षत्रिय असून ही तो कोणावरही अन्याय करत नाही. आमच्या समाजातील कोणतीही मुले अशा विद्रुप घटना करत नाहीत. मात्र आज आमच्यावर माता भगिनींवर कोण अन्याय करणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही.
इंदापूर तालुक्यात १२ हजार पेक्षा जास्त रामोशी समाजाचे मतदान असून १८ हजार पेक्षा अधिक समाज आहे. या घटनेतील आरोपीला जामीन होता कामा नये. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा. रामोशी समाजाला वतनाने जमीनी मिळाल्या आहेत काही ठिकाणी समाजाची अडवणूक होते. जमीनी कसून दिल्या जात नाहीत त्यावर उचित कार्यवाही करावी. अशा मागण्याही अध्यक्ष दौलत शितोळे यांनी प्रशासनाकडे केल्या. दरम्यान ही घटना घडल्यानंतर आरोपी वरती गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीला अटक केली या बद्दल त्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा