Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०२३

"प्रहार दिव्यांग अपंग क्रांती आंदोलनाच्या"- सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी-" कासिम मुलाणी यांची निवड.

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी

                             "प्रहार दिव्यांग ,अपंग, क्रांती आंदोलन" महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी *कासिम मुलाणी* " यांची निवड करण्यात आल्याचे पत्र विजयसिंह मोहिते पाटील अपंग संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष व सोलापूर जिल्हा प्रहार दिव्यांग अपंग क्रांती आंदोलनाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख- *शहाजी भीमराव माने देशमुख यांनी प्रहार दिव्यांग अपंग क्रांती आंदोलनाचे राज्य अध्यक्ष- *ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू पाटील* यांच्या आदेशानुसार देण्यात आले आहे.



तसेच प्रहार दिव्यांग अपंग क्रांती आंदोलन संघटनेची ध्येयधोरणे, आणि शासनाची दिव्यांगासाठी असणाऱ्या योजना, बेरोजगारी, दिव्यांगाचे राजकीय तसेच सामाजिक पुनर्वसन हे सर्व प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार असून सर्व प्रवर्गातील दिव्यांगांणा मुख्य प्रवाहात आणावयाचे कार्य व संघटनेचे विचार प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचवून योग्य तो न्याय "प्रसिद्धी माध्यमातून" देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे -सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख *कासिम मुलाणी* यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा