Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०२३

शंकरनगरचा" शिवतीर्थ आखाडा" नामवंत मल्लांनी फुलला

 


*अकलूज----प्रतिनिधी*

 *केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

                          सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर अकलूज यांचे वतीने आयोजित केलेल्या ४५ व्या अखिल भारतीय त्रिमूर्ती केसरी कुस्ती व वजन गट स्पर्धेत दुसऱ्या दिवशी सुमारे ४५० कुस्त्या पार पडल्या.यामध्ये नामवंत मल्लांनी सहभाग घेतला. 

        श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त आणि सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच बंधूंच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त दि.२९,३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२३ या कालावधीत त्रिमुर्ती केसरी व वजनगट कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे.

             या स्पर्धेसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,जयसिंह मोहिते पाटील,मदनसिंह मोहिते पाटील, अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील,स्पर्धा प्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील,यांचे सह परिसरातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी,सदस्य, कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने प्रमुख उपस्थित होते.

        या स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले मल्ल सुमित मलिक,प्रवीण चहर, श्रीनिवास पाथरूड,शुभम चव्हाण, सतपाल सोनटक्के,अनिल जाधव,तुषार दुबे,रजत चहल,जसपुरण सिंग, अमित राठी,विकी कुमार,बंटी कुमार,विनोद कुमार,विशाल कालीरमण,रविराज चव्हाण, विकी हुड्डा,कालीचरण सोलनकर आदींचा सहभाग आहे.                          

        हरियाणा,दिल्ली,मध्य प्रदेश,पंजाब,महाराष्ट्र येथील वजनी गटात ६१२ तर खुल्या गटात १०८ अशा एकूण ७२१ मल्लांनी सहभाग नोंदविला. त्रिमूर्ती केसरी स्पर्धेच्या अंतिम कुस्तीसाठी पद्मश्री अर्जुन पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय पैलवान कर्तारसिंग व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रीय स्तरावरील मल्ल हरियाणाचा प्रवीण भोला व कोल्हापूर येथील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्यात तर पुणे येथील समीर शेख व कंदर येथील सतपाल सोनटक्के यांच्यात विशेष कुस्त्या होणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा