अकलूज(प्रतिनिधी) लक्ष्मीकांत कुरुडकर.
श्री शंकर महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा.
सुमारे दोनशे वर्षांपूर्वी श्री शंकर महाराजांच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेल्या बारभाई गट येथील मंदिरात श्री शकर महाराज प्रगट दिन विविध धार्मिक उपक्रमाने व मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
श्री शंकर महाराज जुन्या अकलूज-महाळुंग रस्त्यावरील बारभाई गट येथील भगत यांच्या मळ्यात (पूर्वीची गिरमे वस्ती) वास्तव्यात येत होते. तेथील एका पिंपळाच्या झाडाखाली ते तपश्चर्या करीत असत. कधी पंधरा दिवस,दोन महिने तर कधी सहा सहा महिने वास्तव करीत होते. आजही ते पिंपळाचे झाड असून त्या झाडासमोरच सतीश भगत व त्यांच्या सवंगड्यांनी सन २०१८ सारी मंदिर उभा केले. या मंदिरात श्री महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून या मंदिरात कार्तिक शुद्ध ८ दुर्गाअष्टमी दिवशी प्रगट दिन वैशाख शुद्ध अष्टमी दिवशी समाधी दिवस मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा करण्यात येतो. या दिवशी सकाळी पादुकास रुद्राभिषेक, भजन, कीर्तन, आरती व फुलांचा कार्यक्रम व महाप्रसाद करण्यात येतो. या कार्यक्रमास परिसरातील सुमारे एक हजार भक्त उपस्थित असतात. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश भगत, अमित टिळेकर, मुकुंद पवार, अभिजीत टिळेकर, गोविंद नागटिळक, मंगेश शेटे आदी परिश्रम घेत असतात. या मंदिरात दर गुरुवारी व प्रत्येक दुर्गाष्टमी अभिषेक व विशेष पूजा केली जाते. तसेच श्री महाराजांनी तपश्चर्या केलेल्या या पावन ठिकाणी अनेक भक्त श्री शंकर गीता व नवनाथ ग्रंथाचे पारायण करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा