Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ मार्च, २०२६

*अकलूज पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान*

 *मुख्य संपादक*

        *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

   ‌.            *मो:-9730867448*


अकलूज पोलीस ठाणे येथे आज दिनांक 8 मार्च रोजी (International Women's Day) जागतिक महिला दिना निमित्त कार्यक्रमाचे सकाळी  ११ ते  दुपारी  १वाजेपर्यंतआयोजन करण्यात आले होते   


सदर कार्यक्रमास अकलूज नगर परिषदेचे नगराध्यक्षा सौ रेश्माताई आडगळे  महिला नगरसेवक, अकलूज पोलीस ठाणे येथील महिला पोलीस पाटील, महिला होमगार्ड, महिला दक्षता समितीतील डॉक्टर,वकील, शिक्षक समाजसेविका असे सर्व सदस्य तसेच पोलीस ठाण्याकडील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार आदि महिलांचा  जागतिक महिला दिनानिमित्त फेटा बांधून पुष्पगुच्छ तसेच फुलांचे वृक्ष देऊन देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या 

अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने अकलूज व परिसरातील विविध क्षेत्रातील धडाडीने कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार अकलूज पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक करिश्मा वणवे यांचा शुभहस्ते करण्यात आला.यामध्ये पोलीस पाटील,महिला होमगार्ड, महिला दक्षता समिती,डॉक्टर, वकील,शिक्षण क्षेत्र,समाजसेविका, पोलीस ठाणे क्षेत्राततील महिला पोलीस यांना सन्मानित करण्यात आले

            या कार्यक्रमात अकलूज नगरपरिषदेचे पहिल्या महिला नगराध्यक्ष सौ.रेश्माताई आडगळे, महिला नगरसेविका मनिषा तिकोटे, नम्रता जगताप,मृदुला सुर्यवंशी, मंदाकिनी पाटोळे,रेश्मा तांबोळी, वैशाली भोसले,उज्वला विटकर, स्वाती फुले,दिपाली वाघमोडे, जयश्री एकतपुरे,प्रियंका गायकवाड,पोलीस पाटील तेजस्वी दळवी (संगम),सुभद्रा चंदनशिवे (जांभुड),मनिषा पाटील (बोरगाव), वैद्यकीय क्षेत्रात डॉ.मानसी देवडीकर,सामाजसेविका छाया बुराडे,फातिमा पाटावाला,डाॅ. मिनाक्षी जगदाळे,शिक्षण क्षेत्रात कल्पना मोरे,हसरून मुलाणी, आरती तोरणे,हसिना शेख महिला उद्योजक,हेड कॉन्स्टेबल अनुराधा अडगळे,हेड कॉन्स्टेबल मंदाकिनी चव्हाण यांचा फेटा बांधून, पुष्पगुच्छ व फुलांचे झाड देऊन

यथोचित सन्मान करण्यात आला.

            या यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी आपल्या अनुभव सांगत महिलांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी,समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शनपर विचार मांडले.तसेच महिला सुरक्षेबाबत आणि सक्षमीकरणाबाबतही चर्चा करण्यात आली.यावेळी पोलीस ठाण्याकडील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा