*संपादक---- हुसेन मुलाणी*
*! टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
खानापूर ता. तुळजापूर गावात राहणारे आणि कांही कामानिमित्त नोकरी व्यवसाय करण्यासाठी बाहेर गावी राहणाऱ्या सर्व सत्ताधारी सदस्यांना व समर्थकांना ग्रामपंचायत चे विरोधी पक्ष नेते बंडू उत्तम धुत्ते विनंती करतो की सत्ताधाऱ्यांनी ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच-संबधीत सदस्यांना जाब विचारा ... तुम्ही हक्काने जो पॅनेल निवडून आणला आहे तुम्ही खूप कष्ट घेऊन आश्वासने देऊन हात पाय जोडून पॅनेल निवडून आणले आहे त्याच सोनं करा अन्यथा ग्रामपंचायत सत्ताधार्यांना जाब विचारा .
अन्यथा पुढच्या वेळेस सामान्य जनता तुमचं ऐकणार तर नाहीच तुमच्या वर विश्वास कसा ठेवेल उलट तुम्हालाही ग्रामस्थांच्या रोषाला समोर जावं लागेल.
विकासकामांना आम्ही विरोधकही समर्थनच करणार पण तुम्ही काम करा ही हात जोडून विनंती करतो ग्रामविकासासाठी मी ह्जारवेळेस विनंती आणि हात जोडण्यास तयार आहे...
*खानापूर ग्रामपंचायत बाबत च्या तक्रारी*
१) ग्रामपंचायतची मासिक सभा व ग्रामसभा गेल्या सहा महिन्यापासून आयोजित केली जात नाही.
२) ३० लाख रुपये निधी असून सुद्धा गावासाठी एकही रुपया खर्च केला जात नाही.
३) गेल्या तीन वर्षात एकही रुपयाचा विकास निधी गावामध्ये खर्च केला नाही ( अपवाद एक नळ जोडणीचे काम आणि एक ९० हजारांचा सिमेंट रस्ता सोडून .
४) मासिक सभा किंवा ग्रामसभेत दिलेल्या एकाही लिखित / अध्यक्ष्यांच्या उपस्तिती मांडलेला विकास मुद्द्दा / तंटे किंवा असे अनेक प्रश्न मीटिंग नन्तर दुसऱ्या दिवशी विसरून जातात पुन्हा ते मुद्देच पुढील सभेत फक्त लिहून घेतात.
५ ) लाखों रुपयाचा निधी शिल्लक असूनही यांची काम करण्याची मानसिकता नाही / किंवा याना कामाचे स्वरूप किंवा काम करायची इच्छा नाही .
६) १३ १४ आणि १५ वित्तआयोगाचे लाखो रुपये न खर्च करता गावातील ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता घरपट्टी / नळपट्टी वसूल करणे आणि आणि गेल्या दोन वर्षात घरपट्टी / नळपट्टी च्या एकही रुपयाचा हिशोब न देणे.
७ ) कोणत्याही शासनाच्या विकासकामांची माहिती ग्रामसेवक सदस्य या नात्याने आम्हाला कळवत नाहीत.
आपलाच...
बंडू ( भैय्यासाहेब ) उत्तम धुते.
ग्रा. पं . सदस्य तथा विरोधीपक्ष नेता खानापूर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा