Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ डिसेंबर, २०२३

अकलूज येथील, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राचे "क्रीडा महोत्सव स्पर्धेत" यश

 


अकलुज प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी.

     

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत शिरूर (जिल्हा-पुणे) या ठिकाणी क्रीडा स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या क्रीडा महोत्सव स्पर्धेत अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालय अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात यश संपादन केले आहे.



            यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा या वर्षीचा क्रीडा महोत्सव सी.टी. बोरा महाविद्यालय शिरूर (जिल्हा.पुणे) या ठिकाणी नुकत्याच संपन्न झाल्या.या क्रीडा महोत्सवात अकलूज अभ्यास केंद्रातील विशाल बाबर-गोळा फेक (प्रथम क्रमांक), कु.भाग्यश्री काळे-800 मीटर धावणे (प्रथम क्रमांक),ऋषिकेश घाडगे-उंच उडी (प्रथम क्रमांक),कु.मनीषा मचाले-400 मीटर धावणे (द्वितीय क्रमांक) व लांब उडी (द्वितीय क्रमांक) तर तानाजी शेंडगे याचा हॉलीबॉल संघात समावेश करण्यात आला आहे.



        अकलूज अभ्यास केंद्रातील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यश संपादन केल्याने शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते- पाटील,संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील,संचालिका कु.स्वरुपाराणी मोहिते-पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे अभ्यास केंद्राचे केंद्रप्रमुख प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे,केंद्र संयोजक डॉ.बाळासाहेब मुळीक,अभ्यास केंद्रातील सर्व समंत्रक यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा