बी.टी.शिवशरण---श्रीपूर.
महाळुंग श्रीपूर नगरपंचायत सत्तेत येऊन दोन वर्षे कालावधी होत आहे मात्र नगरपंचायत माध्यमातून विकासाची कामे संथपणे सुरू असल्याचे सांगितले जाते नागरीसुविधा देण्यात नगरपंचायत सपशेल नापास झाली आहे असे म्हटले तर चुकीचं होणार नाही कचरा गाडी सुरू केल्या असे मोठ्या आविर्भावात सांगितले जाते श्रीपूर मध्ये कुठेही सार्वजनिक स्वच्छता गृह नसल्याने नागरिक कुठेही रस्त्यावर व महत्वाचे जागी लघुशंका करून परिसर अस्वच्छ करतात बरेच ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकला जातो तो उचलला जात नाही घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जातो मात्र निदान आठवड्यातून एकदा तरी सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा उचलला गेला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे नगरपंचायत सार्वत्रिक स्वच्छता नागरीसुविधा देत नसल्याने श्रीपूर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाठीमागे अक्षरशः नागरिक रस्त्यावर शौच करतात परिसरात मेलेली कुत्री मांजरे घुशी या ठिकाणी आणून टाकली जातात त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे शिवाजी चौक ते जुना लिकर रस्त्यावर एकदा जाऊन पहाणी करण्यात यावी म्हणजे स्वच्छतेची ऐशी की तैशी अवस्था निदर्शनास येईल या भागातील स्थानिक नगरसेवक लक्ष देत नाहीत तसेच नगरपंचायत अधिकारी कधीही इकडे फिरकत नाहीत त्यामुळे सर्व अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागतो बर्याच वेळा नागरिकांतून असे बोलले जाते नगरपंचायत पेक्षा ग्रामपंचायत बरी होती असे म्हणायची वेळ आली आहे नगरपंचायत कडे निवेदन तक्रार अर्ज दिले तर दखल घेतली जात नाही एकमेकांवर टोलवाटोलवी केली जाते या सर्वांचा परिपाक म्हणून नागरिक पुर्ण त्रासलेले आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा