Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

*उजनी धरणाचे पाणी पेटणार*.. *31 डिसेंबरला उजनी धरणावर युवा सेना घेणार जलसमाधी* *उजनी धरण हे राजकीय पुढाऱ्यांनी केला राजकारणाचा अड्डा-- युवा सेनेचा आरोप*..

 




*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो.9730 867 448*

                शिवसेना युवासेना सचिव वरून सरदेसाई युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व सचिन बागल युवा सेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख व युवा सेना माळशिरस तालुका व माढा तालुक्यातील युवा सेनेचे पदाधिकारी उजनी धरणावर रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता जल समाधी आंदोलन घेणार आहेत. उजनी धरणातून 1 नोव्हेंबर ला कालव्याला सोडलेले पाणी 1 डिसेंबर ला बंद करण्याचे पाणी नियोजन बैठकी मध्ये ठरलेले असतानाही ते पाणी आज तागायत बंद केले नाही . पाणी बंद करण्यासाठी पाटबंधारे खात्याचे अधिकारी व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना जाग येण्यासाठी युवा सेनेच्या वतीने 23 डिसेंबर रोजी उजनी धरणावर बोंबा बोंब आंदोलन करण्यात आले होते परंतु या आंदलानातून यांना जाग आलीच नाही .आगामी लोकसभा व विधानसभा तोंडावर आल्या मुळे राजकीय पुढाऱ्यांनी उजनी धरणाचा राजकीय अड्डा करून ठेवला आहे त्यामुळे धरण ग्रस्तांवरती अन्याय होत आहे .





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा