Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

*मनाचा मोठेपणा-- स्वभाव हीच ताकद- निस्वार्थ सत्कार्य हीच ओळख ---संग्रामसिंह मोहिते पाटील*( *अण्णासाहेब*)

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो.9730 867 448*

             आनंदाचे क्षण क्षणातच उलगडून जातात,परंतु आपल्या मनात त्या कोरलेल्या आठवणी-घटना कायम अलिप्त राहतात... आणि त्या सोनेरी क्षणांना अमृत्व देतात...!

 असाच एक क्षण सदाशिवराव माने विद्यालय येथे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विज्ञान,कला व प्रदर्शन सोहळ्याचं मा.संग्रामसिंह मोहिते-पाटील(आण्णासाहेब)

(अध्यक्ष,शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज) यांच्या शुभहस्ते व कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील(दिदीसाहेब)

(अध्यक्ष,प्रताप क्रीडा मंडळ,शंकरनगर-अकलूज) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

व्यासपीठावरील औपचारिक नंतर चित्रकला दालनाकडे फीत कापणेसाठी आण्णासाहेब रवाना झाले.सोबत प्रशाला समिती सदस्य बाळासाहेब सणस,इकबाल काझी,मनोज रेळेकर,मुख्याध्यापक प्रताप पाटील सर ,शिक्षकवृंद,विद्यार्थी प्रतिनिधी कु.गीतांजली माने-देशमुख व कु.शौनक कुलकर्णी उपस्थित होते.विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांनी विविध कला प्रकारात रेखाटलेले चित्रं आण्णासाहेब अत्यंत बारकाईनं न्याहळत विद्यार्थ्यांना शाबासकी देत-कौतुक करत होते.याच दरम्यान मा.आण्णासाहेबांनी आपल्या खिशात हात घातला आणि सहभागी विद्यार्थ्यांना खाऊसाठी- त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे म्हणून रोख रक्कम वीस हजार रु. विद्यार्थ्यांच्या हातात देऊ केले.आजकाल असं पाहायला मिळणं दुर्मिळच.. वाह वाह करणाऱ्या शेकडो व्यक्तिंपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती आयुष्याला यशाच्या मार्गावर नेण्यासाठी पुरून उरते...मोठ्या मनानं आणि सढळ हातानं कौतुक करणारं.. आढेवेढे न घेता सरळ बोलणं..तोंडावर स्पष्ट बोलणं..असं लोकविलक्षण युवा नेतृत्व म्हणून आण्णासाहेबांची या पंचक्रोशीत ख्याती आहे,कित्येक गोरगरीब,गरजूंना प्रत्येकाला निःस्वार्थपणे आजवर यथासांग केलेली मदत-सहकार्य सर्वश्रुत आहे.निःस्वार्थ सत्कार्य हीच आण्णासाहेबांची ओळख जणसामान्यांमध्ये दृढ आहे ते यामुळेच.छल में निःसंदेह बल है,किन्तु स्नेह आज भी हर समस्या का हल है..सुखाचा एक क्षण बाजारात विकत मिळत नाही,त्यासाठी माणुसकीनं-स्नेहानं माणसं कमवावी लागतात...कित्येकांच्या समस्येवर आणसाहेबांनी आपुलकीनं मात केली आपलं समजून...



    मूर्तीच्या रूपातल्या देवापेक्षा देवत्वाचा प्रत्यय देणारी माणसं पूजनीय वाटतात...शेवटी तृप्ती ही तात्कालिक भावनिक अवस्था आहे; विश्वाच्या प्रचंड पसारातल्या केवळ ठिपक्याऐवढ्या अणूमात्र आयुष्यात जगण्याचं उद्दिष्ट गवसण हे महत्त्वाचं...

आदरणीय आण्णासाहेबांना ते उद्दिष्ट थोरामोठ्यांच्या आशीर्वादानं-मार्गदर्शनानं लाभलंय-गवसलंय..!

अशा किती तरी आठवणींचा-गोष्टीचा साक्षीदार म्हणून संवेदनशील मनाला भाषेचा सुगंध... त्यातल्या अनुभव संपन्न शब्दांमधून व्यक्त होताना चिरकाल राहतात मनात-हृदयात.!

यथावकाश पुन्हा अशाच काहीं आठवणीसह भेटू..बोलू..!

आण्णासाहेब,

आपण प्रत्येकाला पाठबळ आणि आपुलकीची थाप देऊन अनेक माणसं जोडलीत...त्या माणसांमध्ये आम्हीं एक आहोत ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे..!

आदरणीय आण्णासाहेब,

औक्षवंत व्हा..यशवंत व्हा..!

आपणांस वाढदिवसाच्या हा, र्दिक हार्दिक शुभेच्छा..!

शुभं भवतु...!


उत्कर्ष शेटे आणि परिवार






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा