*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ ते १० जानेवारी २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय भव्य लेझीम स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष व जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील या बंधूच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त सदरच्या स्पर्धाचे आयोजन केले आहे. ग्रामीण खेळ, व कलेचे जतन व संवर्धन करणारे जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळांने आजपर्यंत ४० हजार पेक्षा अधिक
लेझीम खेळाडू, प्रशिक्षक निर्माण केले आहेत. गिनिज वर्ल्ड बुक मध्येही अकलूज च्या लेझीम खेळाची नोंद झाली असल्याची माहिती मंडळाच्या कार्याध्यक्षा कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी दिली आहे. विजय चौक अकलूज येथे या स्पर्धा होणार असून याकरिता प्राथमिक गट, ग्रामीण मुले व मुली गट व शहरी मुले व मुली गट असे स्वतंत्र पाच गट आहेत.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास रुपये ५हजार, द्वितीय क्रमांक ४ हजार, तृतीय क्रमांकास रुपये ३हजार व सन्मान चिन्ह याचबरोबर उत्कृष्ट प्रशिक्षक, उत्कृष्ट हलगी वादक, उत्कृष्ट घुमके वादक, उत्कृष्ट सनई वादक यांना देखील स्वतंत्र बक्षीस देण्यात येणार आहेत. या स्पर्धा गुण पद्धतीने खेळवल्या जाणार असून प्रत्येक संघास सादरी करण्यासाठी दोन डाव
दिले जाणार आहेत. मंडळाच्या वतीने प्रत्येक खेळाडूस भोजनही दिले जाणार आहे. दिनांक २ जानेवारी पर्यंत संघांनी आपली नाव नोंदणी खालील नंबरवर करावी असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. संजय राऊत ९८९० ४३४ २१०, बिभीषण जाधव ९८ ५०० ३९ ६०८, अर्जुन बनसोडे ९८ ६० ३३ ७९ ४३, सुजित कांबळे ८४ २१ १० ११ २१, अमोल बनपट्टे ७० २० ६५ ८८ ०४,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा