इंदापूर तालुका--प्रतिनिधी
एस.बी. तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी.
मो.8378 081147
इंदापूर तालुक्यातील रणगाव येथे ट्रॅक्टर चक्क विहित पडल्याने अपघात झाला मात्र दैव बलवत्तर यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही .
याबाबत सविस्तर वृत्त असे की रणगाव ता. इंदापूर जि. पुणे येथील अंकुश रामचंद्र रणमोडे यांच्या मालकीचा स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक M H- 42 -AS -76 50 हा ट्रॅक्टर त्यांचा चालक शेतीची कामे करण्याकरता शेतात घेऊन गेला होता शेतामधील कामे पूर्ण करून चालक शेतातून ट्रॅक्टर घेऊन घराकडे परतत असताना चालू ट्रॅक्टर मध्येच क्लच स्प्रिंग तुटल्याने चालकाने ट्रॅक्टर वरील ताबा घेण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रॅक्टर वरील ताबा घेण्यास अपयशी झाल्याने ट्रॅक्टर वेगात असल्याने प्रसंगावधान साधून चालकाने ट्रॅक्टर वरून उडी मारल्याने चालकाचा जीव वाचला चालकाच्या समय सूचकतेमुळे चालक स्वतःचे प्राण वाचवण्यास यशस्वी झाला त्यामुळे त्याच्या धाडसाचे कौतूक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा