Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

"मोहिते पाटील "परिवार कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ आणि त्यांना जपणारा परिवार आहे.----प्रकाश चोपडे,व्होळे ता.माढा.

 


*टाइम्स 45 न्युज मराठी,नेटवर्क*

*मो..9730 867 448*

           कुर्डूवाडी परिसरात ज्यांनी जनसेवा संघटनेचे माढा तालुकाध्यक्ष म्हणून लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या सोबत अगदी कट्टर आणि प्रामाणिकपणे काम केलं असे तानाजी नागटिळक( कुर्डूवाडी) यांचे कोरोनाच्या महामारी मध्ये त्यांचे स्वतः आणि त्यांच्या पत्नी या दोघांचेही निधन झाले होते परंतु त्यांनी समाजिक क्षेञात केलेलं काम आतुलनीय होते, लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या जनसेवा संघटनेच्या माध्यमातून केलेली समाज सेवा सामाजिक कार्य या पंचक्रोशीतील जनता विसरणार नाही आणि याच ओळखीतून तानाजी नागटिळक यांचा मुलगा युवराज नागटिळक मोटर सायकल वरून पडल्यामुळे हाताला इजा झाली खऱ्या अर्थाने आज तानाजी नागटिळक यांनी माढा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात समाजकार्य केलं



 त्यांनी त्यांच्या हायातीमध्ये धनसंपदा न कमवता जनसंपदा कमवली आणि नक्कीच त्यांच्या या समाजसेवेचा त्यांच्या मुलास फायदा होईल परंतु आज तानाजी नागटिळक यांचा मुलगा युवराज याची भेट घेतल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर कंठ दाटून आला आणि आज युवराज नागटिळक यांच्या डोक्यावरचे आईचा आणि वडिलांचे छत्र हरपला आहे त्यामुळे याप्रसंगी त्याला धीर दिला आणि मी सुद्धा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे परंतु धैर्यशील मोहिते पाटील (भैय्यासाहेब )रणजीत सिंह मोहिते पाटील( दादा) यांच्या माध्यमातून युवराज याच्या शिक्षणासाठी असेल अथवा त्याच्या छोट्या मोठ्या नोकरीसाठी असेल युवराजला शंभर टक्के धैर्यशील (भैय्यासाहेब )मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह(दादा) मोहिते पाटील यांची भेट घडवून भेट मी युवराज साठी शंभर टक्के प्रयत्न करेन कारण मोहिते पाटील परिवार हा कार्यकर्त्याला जपणारा परिवार असून नक्कीच त्यांचे सहकार्य लाभेल असे सांगितल्यानंतर त्यावेळी युवराज चेही डोळे पाणावले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा