Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

ओंकार साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले -----चेअरमन ,-बाबुराव बोत्रे पाटील! ऊस बिले वेळेत दिल्याने शेतकरी वर्गात समाधान

 


निमगाव ----प्रतिनिधी

 रामभाऊ मगर

  टाइम्स 45 न्युज मराठी.

            या वेळी बोलताना चेरअमन बाबुराव बोञे पाटील म्हणाले की ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट एक ऊस उत्पादक शेतकऱ्यांत च्या ऊसाला पहिला हाप्ता २७००रूपये प्रमाणे १नोव्हेबर ते १५ पर्यंत या अगोदर दिला असुन १६ ते 30नोव्हेबर पर्यंत चा पहिला हाप्ता शेतकऱ्यांची व ऊस वाहतुक दरांची बीले खात्यावर जमा करण्यात आली असुन शेतकऱ्यांच्या आर्थिक अङचणीच्या काळात वेळेत ऊस बीले शेतकऱ्यांना देण्यासाठी ओंकार साखर कारखाना परिवार कटिब्ध असल्याचे ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले.                                                

       या कारखान्याचे विस्तारीत करण व उपपदार्थ प्रकल्पांची कामे अंतिम टप्प्यात आहेत मी शेतकरी कुटुंबातील असल्याने शेती करीत असताना अनंत अङचणीचा सामाना करावा लागतोय याची जाणीव मला आहे कारखान्याकङुन शेतकऱ्यांना जे देणे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करू तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस ओंकार साखर कारखान्याला घालावा असे आवाहन बाबुराव बोञे पाटील यांनी केले या वेळी ओंकार परिवाराची संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांत बोञे पाटील जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे आधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा