Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

शासनाची फसवणूक केल्याने टणूचे शरद जगदाळे यांची पोलीस पाटीलकी निलंबित

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

           - टणु गावचे पोलीस पाटील शरद श्रीधर जगदाळे यांना तीन अपत्ये असल्याचे निष्पन्न झाल्याने बारामती चे उपविभागीय अधिकारी वैभव नावाडकर यांनी त्यांना निलंबित करण्याचा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

     याबाबत सविस्तर वृत्त असे की सोमनाथ चंद्रकांत मोहिते (रा. टण्णू, ता. इंदापुर) यांनी दि. १७/९/२०२१ रोजी बारामतीचे उपविभागीय अधिकारी यांचेकडे टणूचे गावच्या पोलीस पाटील पदी शरद जगदाळे यांची नियुक्ती होऊन त्यांनी अपत्य कायदा २००५ चे उल्लघंन करुन शासनास खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली आहे. पोलीस पाटील शरद जगदाळे यांची २००९ साली नियुक्ती झाली आहे. त्यांना २००५ पूर्वी दोन व २००७ नंतर १ अशी तीन अपत्य आहेत. त्यांना तीन अपत्य असून त्यानी शासनाची फसवणूक केली आहे. तसेच गावात वाद- विवाद लावणे, शेतक-याचा रस्ता आडविणे, भाऊ-भाऊकीमध्ये भांडणे लावण्यासाठी पोलीस पाटील पदाचा गैरवापर करत आहेत. तरी त्याची पोलीस पाटील पदावर झालेली नियुक्ती रद्द होऊन त्याच्यावर कार्यवाही व्हावी अशा प्रकारचा त्यांचे विरुध्द तक्रारी अर्ज अर्जदार सोमनाथ मोहिते यांनी केलेला होता.   

      सदर तक्रारीची बारामती उपविभागीय अधिकारी यांनी दखल घेऊन इंदापूरचे तहसीलदार यांचे मार्फत चौकशी केली. त्यावेळी टणूचे पोलीस पाटील शरद जगदाळे यांना तीन अपत्ये असल्याचे सिद्ध झाले असल्याचे दिसून आले. सदर बाबत बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावाडकर यांनी दि. २०/१२/२०२३ रोजी टणू पोलीस पाटील शरद जगदाळे यांना महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम, १९६७ चे कलम ५ अन्वये निलंबित करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला. 

    पोलीस पाटील काळात शासनामार्फत दिलेल सर्व मानधन शासनाने परत घ्यावे. तसेच त्यांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायद्यानुसार फौजदारी कारवाई करावी अशी मागणी सोमनाथ मोहिते यांनी केली आहे. तसेच निकालानंतर तक्रारदार सोमनाथ मोहिते यांनी सत्याचा विजय झाला असून कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे सिद्ध झाले असल्याची प्रतिक्रिया सोमनाथ मोहिते यांनी देत समाधान व्यक्त केले.

---------------------------








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा