Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ३१ डिसेंबर, २०२३

घडशी समाजाच्या प्रलंबित मागण्या अधिवेशनात सादर केल्याने आमदार राम सातपूते व चंद्रशेखर बावणकुळे यांचा सत्कार .

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो.9730 867 448*

               महाराष्ट्र मधील शासकीय सुविधांपासून वंचित असणाऱ्या घडशी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आमदार राम सातपुते यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये घडशी समाजाच्या मागण्या शासन दरबारी मांडून विधानसभेत आवाज उठवल्याबद्दल भारतीय जनता पक्ष माळशिरस तालुका (ओबीसी सेल) उपाध्यक्ष चि.साईराम साळुंखे पाटील व घडशी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री.तुकाराम साळुंखे पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा सन्मान करण्यात आला तसेच माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनीही समाजाच्या मागण्या समाजाची परिस्थिती शासन दरबारी मांडून विधानसभेत आवाज उठवल्याबद्दल त्यांचाही यावेळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला 




महाराष्ट्रातील ओबीसी मधील अतिशय गरीब आणि शासकीय सुविधांपासून वंचित असलेल्या या समाजाला भारतीय जनता पार्टीने न्याय द्यावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी या समाजाच्या विविध मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मान्य कराव्यात व या समाजाला न्याय मिळवून द्यावा याबद्दल समाजाच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांचा शाल श्रीफळ व मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला यावेळी समाजातील अनेक मान्यवर व तरुण उपस्थित होते





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा