Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १ जानेवारी, २०२४

अकलूज येथे नववर्षाच्या स्वागता निमित्त 31 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुगंधी दूध वाटप.

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो.9730 867 448*

              31 डिसेंबर रोजी राञी सर्वञ नवीन वर्षाच्या आगमनाच्या निमित्ताने नागरिक नववर्षाचे स्वागत विविध प्रकारे करत असतात कोणी मांसाहारी करतात तर कोणीदारु चे पॅक रिचवतात परंतु राष्ट्रवादीचे नेते डॉ. अक्षय वायकर यांनी महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व तथा उपमुख्यमंत्री .अजितदादा पवार यांच्या संकल्पनेला दुजोरा देत व्यसनमुक्त महाराष्ट्र घडविण्या च्या दृष्टिकोनातून ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने 31 डिसेंबर रोजी अकलूज गांधी चौक येथे नववर्षाच्या स्वागतासाठी मसाला सुगंधी 1001 लिटर दूध वाटप करून एक नवीन पायंडा तरुणाईला घालून दिला हे अभिनंदनीय व अनुकरणीय आहे, या सुगंधी दूध वाटपाचे संयोजक व आयोजक डॉक्टर अक्षय वाईकर यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाला तरुणवर्ग,जेष्ठ मंडळी तथा महिला यांची लक्षणीय उपस्थिती होती.




याप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा आयोजक डॉ.अक्षय भय्या वाईकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस .साजिद भाई सय्यद,युवा नेते राहुल ढेरे पाटील राष्ट्रवादी युवक नेते मिलींद दादा पवार, अविनाश सोनवणे,मनोज साळुंखे,बाळासाहेब गायकवाड,निखिल देवकर,सोनू राऊत,मयूर भोसले,सूरज भोसले व इतर सर्व मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होते.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा