Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

चांदापुरी येथे श्री संत सद्गुरु बाळूमामा मूर्ती स्थापना व कलशारोहण कार्यक्रम संपन्न...

 


माळशिरस तालुका-- प्रतिनिधी

रशिद शेख

टाइम्स 45 न्युज मराठी.

                चांदापुरी तालुका माळशिरस येथे श्री संत सदगुरु बाळूमामा मुर्ती स्थापना व कलशारोहन कार्यक्रम सोहळा संपन्न झाला माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असणारे श्री संत सदगुरु बाळुमामा मंदीरात मुर्ती स्थापना व कलशारोहन कार्यक्रम सोहळा गुरुभक्तीभुषण पंचमठाधिश आचार्य हरिहरनंदन महाराज पिलीवकर यांचे शुभहस्ते करण्यात आले .सोम दि 25 डिसें धान्य दिवस कार्यक्रम मंगळ दि 26 डिसें 2023 मुर्ती व कलश मिरवणुक सोहळा भंडाऱ्याची उधळण करीत काढण्यात आली. 




व त्यानंतर ह. भ. प. विकास महाराज देवडे गणेशवाडी ( कर्जत ) यांचे किर्तन व आरती व महाप्रसादाचे आयोजन केले होते. गुरु दि 28 डिसें सत्यनारायण पुजा व आदमापुर (वाघापुरचे ) पुजारी यांचे भाकणुक सांगण्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला .तालुक्याच्या काना कोपऱ्यातून बाळुमामाच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात आले होते विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा