Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

माळीनगर (राहुल काॕलनी) येथील सभामंडपाचे काम चालू न केल्यास तीव्र आंदोलनाचा निवेदना द्वारे इशारा .

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो.9730 867 448*

            मौजे माळीनगर ता.माळशिरस जि.सोलापूर येथील यशवंत आंबेडकर वसाहतीमध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत विकास योजने अंतर्गत इ. सन. २०२१-२०२२ या कालावधीत मंजूर असलेले सभामंडप बांधून मिळणेबाबत समस्त यशवंत आंबेडकर वसाहत (राहुल कॉलनी) मधील नागरिक यशवंत बुद्ध विहार संस्थेचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी, आर पी आय -तालुका कार्यकारणी ,च्या वतीने अजित दादा नाईक नवरे यांच्या हस्ते माळीनगर चे ग्रामविकास अधिकारी "मोहन शिंदे "यांना निवेदन देऊन माळीनगर येथील यशवंत आंबेडकर वसाहतीमध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत विकास कामे योजनेअंतर्गत सन 2021- 2022 या कालावधीतील मंजूर झालेल्या सभामंडपाचे काम त्वरित चालू करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे



याबाबत सविस्तर माहिती अशी की

 मौजे माळीनगर येथील यशवंत आंबडेकर वसाहतीमध्ये सभामंडपाचे काम इ. स. २०२१-२०२२ मध्ये मंजूर होवून देखील माळीनगरचे सरपंच / ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांच्या जातीय वादी मानसिकेतून वरील सभा मंडपाचा फंड २५ लाख मंजूर असून तो फंड इतरत्र वळविला जात आहे. तरी दलित वस्तीचा फंड ज्या जागेत मंजूर झालेला त्याच ठिकाणी वापरात यावा अन्यथा जातीवादी सरपंच / ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत माळीनगर यांच्या विरोधात कायदेशीर लोकशाही मार्गाने "हलगी नाद आंदोलन " करणेत येईल. तसेच ७ ते ८ दिवसात कामास सुरुवात करावी तसेच काम सुरु न केल्यास होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदार माळीनगरचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, आणि ग्रामपंचायत सदस्य राहतील असेही निवेदनात म्हटले आहे



माहिती स्तव या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सोलापूर-, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर ,जिल्हा पोलीस प्रमुख (ग्रामीण) सोलापूर, उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज ,गट विकास अधिकारी वर्ग 1 पंचायत समिती माळशिरस, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 3 अकलूज, इत्यादी प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले असून या निवेदनावर यशवंत आंबेडकर वसाहत (राहुल कॉलनी) येथील 46 नागरिकांच्या सह्या आहेत..







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा