Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

चंद्रप्रभू स्कूलची कर्नाटक सहल म्हणजे आदर्श राष्ट्रप्रेम अन् साहस

 


अकलूज(प्रतिनिधी) 

 लक्ष्मीकांत कुरुडकर.

 टाइम्स45मराठी.

                   यावर्षी चंद्रप्रभू इंग्लिश मिडीयम स्कूल, नातेपुते यांची इयत्ता - ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांची "कर्नाटक सहल" ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरली. संस्थेचे सेक्रेटरी विरेंद्रशेठ दावडा यांच्या संकल्पनेतून आणि संस्थेचे चेअरमन नरेंद्रभाई गांधी , सर्व कमिटी मेंबर व मुख्याध्यापिका शितल ढोपे यांच्या मार्गदर्शनातून आणि सहल विभागप्रमुख संजय वलेकर यांच्या नियोजनातून यावर्षीची 'कर्नाटक शैक्षणीक सहल' मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी कर्नाटक मधील जागतिक वारसा स्थळ म्हणून जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणाऱ्या वारसा स्थळांना भेटी देण्यात आल्या. 



दक्षिण भारतातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य, संपन्न, स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आणि भारताची सुवर्णनगरी असणाऱ्या सुप्रसिद्ध विजयनगर साम्राज्याची राजधानी आणि जागतिक वारसा स्थळ म्हणून परिचीत असणाऱ्या "हंपी" या पुरातन शहराला भेट देण्यात आली. हंपीचे अवशेष युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे.

यावेळी हंपी येथील प्रसिद्ध विजय विठ्ठल मंदिर, प्रसिद्ध दगडी रथ,राज सिंहासन, राजदरबार,पुष्करणी,राजवाडा, राणीचे महाल, कमल महाल, राणीचे स्नानगृह, हत्ती शाळा, प्राचीन संग्रहालय, हजार राम मंदिर, पान बाजार, हेमकुट पर्वत, विरूपाक्ष मंदिर , ससूवा गणेश मूर्ती, कृष्णा मंदिर आणि उग्र नरसिंह यांची सर्वात मोठी मूर्ती पहिली. यावेळी विजयनगर साम्राज्याचा इतिहास, स्थापत्य कला, शिल्पकाम, चित्रकाम,विविध मंदिरांचा समूह, त्यांची गोपुरे, नैसर्गिक Ac, पिनहोल कॅमेरा सिस्टम, नैसर्गिक रंगबेरंगी प्रकाश योजना, दगडी खांबातून निघणारे संगीतमय आवाज अशा वेगवेगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्यानी बारकाईने निरिक्षण करून त्या समजून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनच्या चेहऱ्यावर कुतूहल दिसत होते.

यावेळी विद्यार्थ्यांना विजयनगर साम्राज्याचा इतिहास, स्थापत्यकला, शिल्पकाम, राजा कृष्णदेवराय चरित्र व चातुर्य, विजय विठ्ठल मंदिर आणि महाराष्ट्राचा आध्यत्मिक संबंध, हजार राम मंदिरातील चित्रशैलीतील रामायण, विरुपाक्ष मंदिरातील गोपुर रचना, रथांचा इतिहास , लक्ष्मी नरसिंह मूर्तीचा इतिहास सह तत्कालीन आतंरराष्ट्रीय व्यापारातील भरभराट , शेती व पाणी व्यवस्थापन या सर्वांची माहिती शाळेचे इतिहास विषयशिक्षक संजय वलेकर सर यांनी दिली. 

त्यावेळेस विद्यार्थ्यांना उग्र नरसिंह या मूर्तीची माहिती वलेकर सर देत असताना त्याठिकाणी सुप्रसिद्ध मराठीकवी आणि गायक संदीप खरे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. उग्र नरसिंह मूर्तीचा अन् राजा कृष्णदेवराय यांचा इतिहास ऐकून खरे कुटुंबीय भारावून जावून कवी संदीप खरे यांनी श्री. वलेकर यांच्याकडे विचारपूस करून चंद्रप्रभू स्कूलच्या ऐतिहासिक कर्नाटक सहलीचे भरभरून कौतुक केले. एवढ्या दूरच्या सहलीच्या प्रयोजनाचे आभिनंदन करून पुढे बोलताना महाराष्ट्रातील सर्व शाळांनी चंद्रप्रभू स्कूलचा आदर्श घेवून अशा ऐतिहासिक व राज्याराज्यांनच्या सीमा ओलांडणाऱ्या सहलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांनच्या मनात राष्ट्रीय भावना प्रबळ करून त्यांना साहसी अन् धाडसी बनवावे. असे मत कवी संदीप खरे यांनी मांडले. यावेळी वलेकर यांनी कवी खरे यांच्याशी भेट म्हणजे आमच्यासाठी विशेष पर्वणीच असल्याचे म्हटले. 

जागतिक हेरिटेज असणाऱ्या हंपी बरोबर हनुमान जमस्थळ अंजनाद्री, सुग्रीव गुफा, वाली किल्ला, संत बसवेश्वर महाराज जलसमाधीस्थळ कुडल संगम, अलमट्टी धरणावरील वॉटर फाऊंटन, लेझर शो यासारख्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यात आल्या. 

यासहली मध्ये विद्यार्थ्यांनी खूप मनोरंजन व आनंद साजरा करून ऐतिहासिक गोष्टी, स्थापत्य कला, शिल्पकाम यांचे निरिक्षण करून तत्कालीन जीवन शैली समजून घेतली. यावेळी ७५ विद्यार्थ्यांसह शिक्षक वलेकर सर, पिसे सर, अतार सर, सुळ सर, मुजावर टीचर आणि सुतार टीचर सहभागी झाल्या होत्या. वरील सर्वांच्या सहकार्यामुळे कर्नाटक सहल यशस्वी व सुखरूप पार पडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा