पत्रकार---- इक्बाल मुल्ला
सांगली..
मो.8983 587 160
सांगलीतील फळमार्केट समोर 4-4 पोलीस थांबून गोरगरीब नागरिकांची "लयलूट" करण्याच्या "जिव्हाळ्याच्या" प्रश्नी सडेतोड धारदार लेख लिहून मी "प्रशासनाच्या" डोळ्यात अंजन घातले .माझ्या वास्तव ,प्रामाणिक आणि समयोचित लेखाची तातडीने दखल घेतली गेली . आणि आज फळमार्केट समोर गेल्या 13 दिवसापासून एकही पोलीस "थांबत" नाही .
(भविष्यात अवैधपणे कोणी "वाटमारी करण्यासाठी थांबत असतील तर नागरिकांनी तात्काळ त्याचा व्हिडिओ काढावा व "पोलीस अधीक्षकांना" सेंड करावा .
लयलूट होणारी ही "प्रक्रिया" थांबवून जनतेला न्याय दिल्याबद्दल कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांचे अभिनंदन - आभार !
सांगलीत आणखी 5 ठिकाणे अ
शी आहेत जिथे पोलीस वाहनधारकांना अडवून "गैरसोय" करत आहेत .
शिंदे मळ्याजवळ रेल्वे पुलासमोर , सांगलवाडी टोल नाका (इस्लामपूर हुन सांगलीकडे ) ,अंकली नवीन बायपास पूल जवळील हॉटेल नंदनवन - हॉटेल बल्ले बल्ले समोर, जुनी धामणी रोड , "नांद्रे" ला जाणाऱ्या धनंजय गार्डन, जवळ येथे 4-4 पोलीस, वाहनधारकांची "अडवणूक" करतात अशी "माहिती" मिळाली आहे . बहुदा पोलीस अधीक्षक या प्रकारापासून , अनभिज्ञ असावेत.
सूटबूट चा अथवा "पॉश" वाहनधारक असेल तर त्याला न अडवता ,साध्या ड्रेसचा अथवा गावंढळ व्यक्ती असेल किंवा "वाहनचालकाची" गाडी जुनी असेल तर त्याला अडवून कागदपत्रांची मागणी केली जाते व "खुशालीची" लयलूट केली जाते .
कागदपत्र नसतील तर पोलिसांनी 100% आवर्जून दंड वसूल करावा . कारण लाच देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा आहे . मोबाईल मध्ये अथवा गाडीच्या "डिकीत" गाडीची कागदपत्रे आवश्यक आहेतच तथापि जाणीवपूर्वक एखाद्याला "टारगेट" करून आपले इस्पित साधून घेऊन,"काय द्याचे " बोला ,असे म्हणत कायद्याचे रक्षकच ,जनतेला अवैधपणे वागण्याचे "धडे" देत असतील तर यासारखी "दुर्दैवी" बाब कोणती असावी ??
पोलीस आणि जनता हे एकाच
नाण्याच्या दोन बाजू आहेत .त्यामुळे "लेखात" दिलेल्या ठिकाणी भविष्यात असे अनुचित आणि "अडवणुकीचे" प्रकार होणार नाहीत ही अपेक्षा करूया ! पुनःश् पोलीस अधीक्षक श्री. बसवराज तेली यांचे हार्दिक आभार !
इकबाल बाबासाहेब मुल्ला
(पत्रकार)
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज , सांगली .
मोबाईल - 8983587160





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा