Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

"महाराष्ट्र विकास सेना" पक्षाच्या आंदोलनास यश. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा होण्यास प्रारंभ..

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी 

एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

             महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या आदेशानुसार इंदापूर तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयाच्या विरोधात महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे जिल्हा संघटक अविराज माने यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष हनुमंत शिंदे यांनी ५ डिसेंबर रोजी तीव्र स्वरूपात ठिय्या करण्यात आले होते.सदर आंदोलनाच्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी यांनी लवकरच २५% अधिसूचनेनुसार पीक विमा दिला जाईल असे लेखी पत्र दिले होते.


महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे जिल्हा संघटक अविराज माने व शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष हनुमंत शिंदे यांना इंदापूर तालुक्यातील पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना तीन ते चार आठवडे पावसाचा खंड असल्याने विमा नुकसान भरपाईच्या २५%मर्यादेपर्यंत रक्कम देण्याची अधिसूचना काढलेली आहे.व त्यानुसार विमा जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे,असे लेखी पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून दिले आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या आंदोलनामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे,इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या आंदोलनाला यश मिळाले असल्याचे पुणे जिल्हा संघटक अविराज माने यांनी सांगितले.



शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने कृषी अधिकारी कार्यालयाच्या विरोधात ५ डिसेंबरला तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते,त्या आंदोलनामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे,त्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे,हा विजय महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या आंदोलनाचा आहे,इंदापूर तालुक्यातील सर्व घटकांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र विकास पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे.


अविराज माने

पुणे जिल्हा संघटक - मविसे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा