अकलूज ---प्रतिनिधी
लक्ष्मीकांत -कुरुडकर
टाइम्स 45 न्युज मराठी.
सोलापूर जिल्ह्यातील निरा नदीवरील अस्तित्वातील कोल्हापूर पद्धतीचे बंधा-याचे आधुनिक पद्धतीने दुरुस्ती करणे करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील कारवाईसाठी पाटबंधारे विभागाला आदेश दिले असून यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले होते त्या अनुषंगाने हे आदेश देण्यात आले आहेत या बंधाऱ्याच्या बॅरेजेसच्या दुरुस्तीसाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून आणि प्रगतशील शेतकरी समीर पांढरे यांनी आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजुरी देण्यात आली
याबाबत सविस्तर वृत्त असे की
निरा नदीवरील माळशिरस तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेले दगडी बांधकामामध्ये बांधण्यात आलेले खालीलप्रमाणे ४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे जुने झाले आहेत. प्रचलित शासन निर्णयान्वये दगडी बांधकामे ही काँक्रीटमध्ये रुपांतर करणेबाबत शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने ही बंधारे काँक्रीटमध्ये Modernization करणे आवश्यक आहे.
१) कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, ओझरे-तांबवे, २) कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ,माळीनगर, ३) कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, आनंदनगर, ४) कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, बांगर्डे
या 4 बंधा-यामधून पाणी गळती प्रचंड प्रमाणात होत आहे. तसेच अतिवृष्टीमुळे ब-याच ठिकाणी पाण्याने ओव्हर फ्लैकींग होत आहे. याशिवाय बंधा-याचे बर्गे टाकणे-काढणे करिताही प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे अपेक्षित पाणीसाठा व त्यावरील सिंचनाची उद्दिष्टे साध्ये होत नाहीत.
याकरिता अस्तित्वातील उपरोक्त दगडी कोल्हापूर पद्धतीचे बंधा-याचे कॉक्रिटमध्ये Modernization करण्याचे काम हे "विस्तार व सुधारणा" कार्यक्रमाअंतर्गत होणेबाबत व त्यासाठीचे सर्वेक्षणाच्या कामास तात्काळ मंजूरी मिळणेकरिता संबंधितांना आदेश दिले आहेत
या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची पाणी गळती थांबली तर शेतकऱ्यांना याचा उपयोग होणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून आभार व्यक्त करण्यात येत आहे






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा