पंढरपूर ---अशपाक तांबोळी.
मो.8788 825 410
सोलापूर, दिनांक 18( जिल्हा माहिती कार्यालय):- अल्पसंख्यांकाच्या कल्याणासाठी शासन विविध योजना राबवत असून, शासनाच्या विविध योजनेचा अल्पसंख्यांक नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच आपल्या हक्क व अधिकार बाबत जागरूक राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे काल अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा चे सहा.प्रकल्प अधिकारी श्री साळुंके आर एम ,मौलाना आझाद विकास महामंडळाचे सहा.जिल्हा व्यवस्थापक श्रीमती रफिया हुंडेकरी, शहर पोलीस आयुक्तालय श्रीमती सोनवणे(ए.सी पी), शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राध्यापक डॉ.आशोक उपाध्याय,जिल्हा क्रिडा अधिकारी श्री नरेंद्र पवार,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता सोलापूर श्री द.क.देवळे उपस्थित होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे म्हणाले,अल्पसंख्याकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव करून देण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात येते. अल्पसंख्याकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोचवाव्यात याची सर्व संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. तसेच अल्पसंख्यांकाच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून, सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनाबाबत निश्चित दखल घेण्यात येईल असेही निवासी उपजिल्हाधिकारी श्री कांबळे यांनी यावेळी सांगितले.
शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयासाठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची संख्या कमी असून, महाविद्यालयात प्रवेशासाठी 70 टक्के फी भरल्यास स्कॉलरशिपद्वारे परत मिळत असल्याचे प्राध्यापक उपाध्याय यांनी सांगितले. तसेच अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृहामध्ये या वर्षी 29 टक्केच प्रवेश निश्चित झाले असून त्यांनी अनुदान वेळेत मिळत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अल्पसंख्याक समुदायासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहचली पाहिजे तसेच या योजनांचा लाभ सर्व अल्पसंख्याक समुदायाला मिळाला पाहिजे. अशी चर्चा यावेळी झाली. त्याचबरोबर तालुकास्तरावरही अल्पसंख्यांक दिवस साजरा करण्यात या अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा