*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
जय हिंद महाराष्ट्र समाज संघटनेतर्फे माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बहुजन समाज कल्याण मंत्री अतुल सावे साहेब पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे घडशी समाजाला आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याने आर्थिक विकास मंडळ स्थापन व्हावे सांस्कृतिक कला मंडळ स्वतंत्र असावी समाजासाठी स्वतंत्र सभा मंडप मिळावे ज्याला जमीन नाही त्यांना शासनाने जमीन कसून खाण्यासाठी द्यावी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीकडून वसाहत बांधून मिळावे देवस्थान इनाम जमिनी प्रस्थापित लोकांनी हडप केल्यात ती समाज बंधना परत मिळाव्यात देवस्थान मंदिरामध्ये असलेले सेवक त्यांना मासिक मानधन मिळावे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूर्वी घडशी समाज सनई चौघडा वाजत होते तिथे मंदिरात दररोज सनई चौघडा चालू करण्यात यावा इत्यादी घडशी समाजाच्या प्रलंबित मागणी मान्य करून घडशी समाजाला मागासवर्गीय प्रवर्ग देण्यात यावा वंचित राहिलेल्या समाजास न्याय मिळावा असा प्रश्न नागपूर हिवाळी अधिवेशनात माळशिरस चे आमदार राम सातपुते यांनी उपस्थित केला त्यामुळे जय हिंद महाराष्ट्र समाज संघटने तर्फे त्यांचावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा