अकलूज ---प्रतिनिधी
लक्ष्मीकांत -कुरुडकर
टाइम्स 45 न्युज मराठी.
नगरपालिकेने मालमत्ता करामध्ये केलेली भरमसाठ वाढ तात्काळ रद्द करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आणि बांधकाम कामगारांचे बंद केलेले जेवण तात्काळ सुरू करण्यात यावे,मोहोळ तालुक्यातील ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणातील तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी,हमीभावापेक्षा दुधाला कमी दर देणाऱ्या दूध संघावर कारवाई करण्यात यावी.सरकारी शाळेचे होणारे खाजगीकरण त्वरित रद्द करण्यात यावे.या मागण्यासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या आदेशानुसार राज्य कार्यकारणी सदस्य राजेश खरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात यशवंत स्टेडियम मध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले होते.यावेळी हनुमंत भुसनर,संकेत गाडे,तुकाराम गोसावी उपस्थित होते.ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य सचिव ए एस सैनिक तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील सह सचिव वैभव राजे घाटगे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनातील मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख राजेश खरे यांना दिले.आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली असल्याचे खरे यांनी सांगितले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा