इंदापूर तालुका----- प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
-माजी केंद्रीय कृषिमंत्री व खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच लोकनेते महादेवराव बोडके दादा यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १५२ रक्तदात्यांनी सहभागी होत रक्तदान केले. त्यांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.
पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील श्रीकांत बोडके मित्र परिवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन बबन बोडके, अशोक बोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत बोडके, नामदेव बोडके, सरपंच प्रतिनिधी सुदर्शन बोडके, उपसरपंच संतोष सुतार, दत्तात्रय शेंडगे, बाळासाहेब घाडगे, वर्धमान बोडके, नबीलाल शेख, आण्णा पाटील, तुषार घोगरे, डॉ. सुमित्रा कोकाटे, प्रियंका पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर येथील अक्षय रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आले. यामध्ये सागर जाधव, अजय रुपणार, स्वॉलिन शिंदे, तुळशीदास आईघोले, केदार बैकात्ती, कु लता, कु निकिता यांनी रक्तदात्यांचे रक्तसंकलन केले. महिला, तरूणां बरोबर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
भविष्यामध्ये गावातील नागरिकांना रक्ताची लागणारी गरज सहजतेने भागवता यावी यासाठी ग्रामस्थांच्या माध्यमातून राबवलेल्या रक्तदान शिबीराचा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन श्रीकांत बोडके यांनी केले. खासदार शरद पवार व लोकनेते महादेवराव बोडके दादा यांच्या कार्याचा समाजामध्ये आदर्श घेण्यासारखा आहे.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन व रक्तदान करण्यात आले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा