तुळजापूर तालुका -प्रतिनिधी
चांँदसाहेब --शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी,
मो.--9850 432 633.
विभागीय लेखापाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोलापूर विभाग बशीरअहेमद तांबोळी यांनी यशस्वी व सन्मानपूर्वक ४०वर्ष सेवा बजावुन गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी सेवेतून सेवानिवृत्त झाले यानिमित्त त्यांच्या विभागातील अधिकारी कर्मचारी व मित्र परिवाराच्या वतीने यथोचित शाल श्रीफळ , पुष्पगुच्छ , पुष्पहार व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला
बशीरअहेमद तांबोळी यांनी खानदेश , विदर्भ , कोकण , पश्चिम महाराष्ट्र या विभागात जलजीवन योजनेअंतर्गत योजनांची निविदा काढणे , कार्यादेश व देयके त्वरित पारित करणे व प्रभावी अंमलबजावणी करणे यामध्ये प्रामुख्याने त्यांचा हातखंडा असायचा
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता पी. व्ही. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अभियंता एस एस बिराजदार , एस एन गरंडे , एम बी भन्साली हे होते उपस्थित मान्यवरांनी तांबोळी यांच्या कार्याचे विविध पैलू उलगडून यशस्वी कामाचे कौतुक करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या
यावेळी सोलापूर , धाराशिव जिल्ह्यातील अधिकारी , कर्मचारी यांच्यासह सामाजिक , राजकिय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहायक अभियंता सिद्राल यांनी व्यक्त केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा