इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
: पंढरपूरहून श्रीक्षेत्र आळंदीकडे श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पायी निघालेल्या गुरुजीबुवा राशिनकर महाराज दिंडीचे स्वागत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा (ता. इंदापूर) मुक्कामी केले. पायी दिंडी सोहळ्याचे हे २२४ वे वर्ष आहे. यावेळी दिंडीप्रमुख हभप रंगनाथ ज्ञानेश्वर राशीनकर महाराज, निरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, विकास पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य संतोष सूर्यवंशी यांनी अन्नदान केले. यावेळी स्वामी महाराज राशिनकर यांचे कीर्तन झाले. हा पायी दिंडी सोहळा पंढरपूरहून पौर्णिमेला दि. २७ नोव्हेंबर रोजी निघालेला असून, आळंदीला सप्तमीला दि. ४ डिसेंबर रोजी पोहोचणार आहे. या दिंडीमध्ये सुमारे १५० ते २०० वारकरी आहेत. या दिंडी सोहळ्याचा आषाढी वारीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथामागे ६ क्रमांकाचा मान आहे. लोणंद मुक्कामी दिंडीची कीर्तन सेवा असते, अशी माहिती संतोष सूर्यवंशी यांनी या वेळी दिली. बावडा येथून सकाळी दिंडी सोहळ्याने आळंदीकडे प्रस्थान ठेवले.
--------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा