तुळजापूर तालुका -प्रतिनिधी
चांँदसाहेब --शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी,
मो.--9850 432 633.
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक अरुण रामचंद्र कुलकर्णी सर २७ वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाल्याने प्रशालेच्या वतीने सपत्नीक शाल श्रीफळ पुष्पहार व महापुरुषांची प्रतिमा भेट देऊन ३०नोव्हेंबर रोजी सत्कार करण्यात आला
त्यांनी यापूर्वी अरळी , येवती , सलगरा दिवटी येथेही सेवा केली आहे मनमिळाऊ स्वभाव व विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी ख्याती त्यांनी मंगरूळ येथे मिळवली त्यांच्या या सत्कार सोहळ्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी माने सर , केंद्रप्रमुख वाले सर , जब्बार शेख सर , तनपुरे सर , उंबरकर सर , कोरेवाडीचे मुख्याध्यापक वडणे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यासाठी मुख्याध्यापक डोलारे सर , हेरकर मॅडम , येरटे मॅडम यांनी परिश्रम घेतले यावेळी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा