Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

*अकलूज येथील छोट्याशा चहा* *टपरी वाल्याची मुलगी झाली* "*इंजिनिअर*". *जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर "गौरी"ने गाठले यशाचे शिखर*..

 


अकलूज --- प्रतिनिधी

    केदार लोहकरे

 टाइम्स 45 , न्युज मराठी.

               माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे राजू काटे व राजश्री काटे या पती पत्नीने छोटेसे चहाचे दुकान आहे.घरची परिस्थिती गरिबीची पण मुलीला इंजिनिअर करण्याचे या दोघांचे स्वप्न होते .त्यांच्या या स्वप्नाला त्यांची मुलगी गौरी हिने प्रतिसाद देत आई वडीलांच्या कष्टाचे चीज करण्याचा निश्चय केला अन् आज तीने जिद्द ,चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर त्यांचे स्वप्न हि पुर्ण तर केले आहे.आज ती इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले माञ इंजिनियर चे रिझल्ट लागण्यापूर्वी पुण्यातील एका खाजगी नामांकित कंपनीत गौरी ला नोकरी हि लागली आहे.


             घरात आई वडीलांचे जेमतेम शिक्षण झाले आहे.परंतु मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट उपसले आहे.आईने शिलाई मशिनवर लोकांचे कपडे शिवून दिले.कधी कधी जुन्या कापडे व साड्यांची गोधडी शिवण्याचे कामा केले .कापडी पिशव्याही शिवण्याचे काम हि केले वेळप्रसंगी .गौरीच्या आईने किराणा मालाच्या दुकानात हि काम केले आहे.वडिलांनी तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजी विकण्याचे काम केलेले आहे.मुलीच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू लागल्यामुळे या पती पत्नीने स्वतःचे छोटेसा हाॅटेलचा व्यवसाय सुरू केला.त्यामुळे मुलीचे शिक्षण पुर्ण झाले आहे.

              ग्रामीण भागात मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी ठेवायला गरीब घरातील पालक सहसा लवकर तयार होत नाहीत.पण मुलीच्या जिद्दीपुढे आई वडीलांना माघार घेऊन तिला प्रोत्साहन देऊन स्वप्न प्रत्यक्षात उतरले आणि गौरी काटे हिने साॅफ्टवेअर इंजिनिअर शिक्षण पुर्ण केले असून ती आता स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे.

       गौरी (वैष्णवी )काटे हिचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण अकलूजच्या जिल्हा परिषद मुलींची शाळा नं.२ अकलुज येथे प्राथमिक शिक्षण झाले आहे.त्यानंतर इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण जिजामाता कन्या प्रशाला अकलुज ला झाले आहे तर अकरावी व बारावीचे सायन्स विभागातून शिक्षण सदाशिवराव माने विद्यालयात झाले.पुढील इंजिनिअर काॅलेजचे शिक्षण कोल्हापूरच्या डी.वाय.पाटील इंजिनिअर काॅलेजमधून साॅफ्टवेअर इंजिनिअर झाले आहे.इंजिनीयर शिक्षणाचा निकाल येण्या अगोदर पुणे येथील डाटा मोटो आयटी कंपनीत तिची निवड होऊन नोकरीला लागली असून आता ती स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे.

          वैष्णवीच्या शिक्षणासाठी अकलूजच्य समृद्धी "स्वयंसहाय्यता महिला बचत गटाचे "मोलाचे सहकार्य लाभले आहे. ज्या ज्या वेळेस शिक्षणासाठी पैसे कमी पडतील त्यावेळेस या बचत गटाने पुर्णपणे आर्थिक मदत व सहकार्य केले आहे.शिक्षण घेत असताना अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव पाटील,शिक्षक एल.डी.बाबर सर,बचत गटांच्या अध्यक्षा प्रतिभाताई गायकवाड याचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

 अशा या गौरी काटे हिच्या "जिद्द, चिकाटी ,कष्टाचे"कौतुक करावे तेवढे कमी आहे तिच्या भावी कारकिर्दीस "टाइम्स 45 न्युज"च्या वतीने *"हर्दिक शुभेच्छा*"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा