*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
"हयातभर मी धर्मशाळा काढत गेलो. परंतू हिच तुमची भेट लवकर झाली असती तर मी धर्मशाळेऐवजी शाळा काढल्या असत्या" असे उद्गार गाडगेबाबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी झालेल्या पहिल्या भेटीत काढले होते...
स्वतःचा मुलगा वारल्यानंतर "असे मेले कोट्यानकोटी काय रडू एकासाठी!!" असे म्हणणारे गाडगेबाबा ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरीनिर्वाणानंतर ढसाढसा रडले होते...
आपल्या तर्कसंगत, विज्ञानवादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचार प्रबोधनाने महाराष्ट्राला अंधश्रद्धा, अनिष्ट चाली-रिती, रूढी-परंपरा, कर्मकांड आणि थोतांडातून शोषणमुक्त करणाऱ्या ज्या खर्या समाजसुधारकाच्या नावावर देशातील एक नामवंत विद्यापीठ आहे..
अशा लोकप्रबोधनकार, विज्ञानवादी, बुद्धीप्रामाण्यवादी गाडगेबाबांचा आज स्मृतीदिन (दि. २० डिसेंबर १९५६) आहे...
त्यानिमित्त त्यांच्या कार्याला, विचारांना आणि स्मृतीला विनम्र अभिवादन,
- चाँद शेख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा