*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
पेन्शनर डे निमित्त दत्तनगर, राऊतनगर, अकलूज ,परिसरातील सदगुरु आनंदी ग्रुप च्या महिलांनी शिंगणापूर ,गोंदवले ,सज्जनगड या तीर्थक्षेत्रा ची एक दिवसीय दर्शन सहल रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सहल आयोजित केली होती या सहलीचे नियोजन, सेवानिवृत्त- मुख्याध्यापक, मारुती क्षीरसागर आणि सहसंयोजक- सुदेश क्षीरसागर, यांनी केले होते या सहलीस उत्तम प्रतिसाद मिळाला असून डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते एसटीची पूजा करून महिला तीर्थ क्षेत्रासाठी रवाना झाल्या
या मध्ये 43 महिलांचा समावेश होता सहलीसाठी 4 ग्रुप तयार करण्यात आले होते प्रत्येक ग्रुपमध्ये 10 ते 12 सदस्य होते त्या अनुषंगाने ग्रुप प्रमुखांनी त्यांच्या जबाबदारीत असलेल्या सर्व सदस्यांची जबाबदारी देण्यात आली होती शिवाय सर्व महिलांनी ग्रुप प्रमुख जे सांगतील त्याप्रमाणे शिस्तबद्ध पद्धतीने ही सहल संपन्न झाली या ग्रुप प्रमुखांमध्ये वंदना क्षीरसागर, अर्चना काळे, वर्षा गायकवाड, शितल माने, यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली ही सहल एसटी महामंडळाकडून जी महिलांसाठी सवलत दिली जाते त्या सवलतीच्या दरात बस उपलब्ध करून दिली होती साधारणतः प्रत्येक महिलेला प्रवास खर्च 400 रुपये झाला या तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या महिलांसाठी डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांच्यावतीने बिस्कीट पाॕकीट व पाण्याची बॉटल प्रत्येकाला देण्यात आली अशा या एक दिवशीय सहलीचा महिलांनी आनंद घेत गोंदवले, शिंगणापूर आणि सज्जनगड येथील दर्शनाचा लाभ घेतला हे सर्व नियोजनबद्ध झाल्याने दर्शन अगदी चांगल्या पध्दतीने झाल्याने महिला वर्गाकडून आभार व समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा