*संपादक---- हुसेन मुलाणी*
*! टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
नागपूर : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या आदेशानुसार पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य तथा कोल्हापूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेश खरे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.यावेळी पेहे शहराध्यक्ष हनुमंत भुसनर,संकेत गाडे,तुकाराम गोसावी यांच्यासह अनेक जण उपस्थित आहेत.
सरकारी शाळेचे होणारे खाजगीकरण त्वरित रद्द करण्यात यावे.बांधकाम कल्याण महामंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना देण्यात येणारे बंद केलेले जेवण त्वरीत सुरू करण्यात यावे. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात मोहोळ येथील ड्रग्ज निर्मिती प्रकरणात पोलीस अधिकारी,राज्य उत्पादन शुल्क व अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. हमीभावपेक्षा दुधाला कमी दर देणाऱ्या दूध संघावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.तसेच गाईच्या दुधाला ४० रुपये आणि म्हशीच्या दुधाला ८० रुपये दर देण्यात यावा.पंढरपूर नगरपालिकेने मालमत्ता करामध्ये केलेली अन्यायकारक वाढ तात्काळ रद्द करण्यात यावी.आशा मागण्या नागपूर येथील चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात यशवंत स्टेडियम येथे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा