Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

जात पडताळणीच्या समस्या संदर्भात देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांना हाजी तनवीर तंबोली यांचे निवेदन.

 


*संपादक---- हुसेन मुलाणी*

*! टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.--9730 867 448*

              ओबीसी समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाला या संदर्भात जात पडताळणी दाखले देण्याची शिफारस करावी अशी मागणी नाशिक मुस्लिम ओबीसी समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे याबाबत सविस्तर वक्त असे की

ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना 

उच्च शिक्षणासाठी जात पडताळणीचा दाखला गरजेचा आहे. तरी जात पडताळणी करत असतांना विद्यार्थ्यांना त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींची कागदपत्रे सादर करणे हे अनिवार्य केले आहे. परंतु आताच्या शासन निर्णयानुसार जर विद्यार्थ्याच्या रक्तातील व्यक्तीचे जात पडताळणी झाले असेर त्याला इतर कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. तसेच सद्यस्थितीत विद्यार्थ्यांनी जर ऑनलाईन जात पडताळणीसाठी अर्ज सादर केलेला असेल तरी त्याला समाज कल्याण ऑफिसला ऑफलाईन पद्धतीने सर्व कागदोपत्री पुरावा सादर करावा लागतो, तसेच काही कागदपत्रे कमी पडल्यास त्यांनर परत अधिक कागदपत्रे सादर करण्याची मागणी केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्यास अडचणी येत आहे.



तरी सद्य परिस्थिती मध्ये उच्च शिक्षणासाठी कॉलेज/महाविद्यालये लगेच जात पडताळणीची मागणी करत आहे. तरी समाज कल्याण ऑफिसला कर्मचाऱ्यांची कमतरता तसेच नाशिक मध्ये १५ तालुक्यातील सर्व विद्यार्थी हे समाज कल्याण कार्यालयात गर्दी करत असतात तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन शासनाला याबाबत गांभीर्याने विचार करण्यास सांगुन जिल्हातील ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या दृष्टीने आपण सूचना कराव्यात अशी मागणी नाशिक येथील ओबीसी नेता ,हाजी तनवीर जब्बार तांबोळी ,यांनी निवेदनाद्वारे शरद पवार यांच्याकडे केली आहे.


हाजी तनवीर जब्बार तंबोली ओबीसी नेता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा