*संपादक---- हुसेन मुलाणी*
*! टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
मौलाना आझाद विचार मंच तर्फे दिनांक 18 डिसेंबर,2023 रोजी 'आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक दिनानिमित्त मुस्लिम समाचाच्या शिक्षण, आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नावर मौलाना आझाद विचार मंच राज्यव्यापी धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने करणार असून मुस्लिम समाजाच्या काही प्रमुख मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकारी / मा. तहसिलदार यांच्यामार्फत आपणाकडे सुपूर्द करीत आहोत. आपल्या शासन दरबारी मुस्लिम समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली असून प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे
1) . 19 जुलै 2014 च्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण द्या
2) केंद्र व राज्याच्या अर्थसंकल्पात मुस्लिमांसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करा
3) पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रमाची कृतीशील अंमलबजावणी करा
4) . मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत 100 टक्के शिष्यवृत्ती द्या.
5) जिल्हा निहाय मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी शासकीय वस्तीगृहाची सोय करा
6) मोबलींचींग जंगली होतील तिथे शीघ्र गतीने जोशीवर कारवाई करा आणि पिढीताना नुकसान भरपाई द्या
7) राजकीय क्षेत्रामध्ये मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व द्या
8) सर्व जाती जमाती जातनिहाय जनगणना करा तसेच त्यामध्ये मुस्लिम O B C -V I N T प्रवर्गातील जातीची जनगणना करा
9) राज्यातील वक्फ संपत्तीचा उपयोग मुस्लिम समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक उन्नतीसाठी करा तसेच समाजातील विधवा आणि तलाक पीडित महिलांच्या उन्नतीसाठी करावा
10) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झुंड हत्याविरोधी विशेष व शिघ्र कृती पथकाची स्थापना करा
11) पार्टी व महाज्योतीच्या धरतीवर मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरची स्थापना करा
12) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मध्ये मुस्लिम समाजाचा समावेश करा
इत्यादी मागण्यासाठी मौलाना आजाद विचार मंचचे अध्यक्ष हुसेन दलवाई यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करणार असल्याचे माहिती मौलाना आझाद विचार मंच चे प्रदेश उपाध्यक्ष -हसीब नदाफ आणि सोलापूर जिल्हा अध्यक्ष- इस्माईल पटेल यांनी सांगितले असुन या धरणे आंदोलनात समाज बांधवांनी हजारो च्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ईस्माईल पटेल यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा