Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २४ डिसेंबर, २०२३

सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये -राज्यस्तरीय टेक्निकल इव्हेंट उत्साह संपन्न..

 


अकलूज --- प्रतिनिधी

    केदार लोहकरे

 टाइम्स 45 , न्युज मराठी.

                 सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाटचालीनिमीत्त कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी "टेकमहर्षि २०२३" हा राज्यस्तरीय टेक्निकल इव्हेंट उत्साहात संपन्न झाला.


        या कार्यकमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालय विकास समिती सदस्य वसंतराव जाधव हे उपस्थित होते.या इव्हेंटमध्ये विविध शाळांमधील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर सादरीकरण स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा,वकृत्व स्पर्धा व प्रकल्प स्पर्धा इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले होते. या इव्हेंटसाठी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला असून जवळपास ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवीला होता.या इव्हेंटसाठी परीक्षक म्हणून डॉ.चारूदत्त पवार,डॉ. अश्विनी रेळेकर,प्रा.रोहित देशमुख हे उपस्थित होते.


          स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे पोस्टर सादरीकरण स्पर्धेमध्ये १० वी गटामध्ये कु.वैष्णवी काळे व कु.साक्षी काळे,महर्षि प्रशाला,यशवंतनगर तर १२ वी गटामध्ये कु.प्रतिक्षा मस्के,शंकरराव मोहिते महाविद्यालय,माळेवाडी अकलूज,प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये १० वी गटामध्ये कु.निर्जला लोखंडे व कु.सपना बोरकर, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर तर १२ वी गटामध्ये चि.वरद वरंगुळे व चि.राहूल चव्हाण,सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज,वकृत्व स्पर्धेमध्ये १० वी गटामध्ये कु. अंकिता आदट बानलिंग विद्यालय,फोडशिरस तर १२ वी गटामध्ये कु. प्रेरणा गायकवाड, सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज तसेच प्रकल्प स्पर्धेमध्ये १० वी गटामध्ये चि.संग्राम पालवे, कर्मवीर बाबासाहेब माने पाटील विद्यालय,सदाशिवनगर तर १२ वी गटामध्ये चि.श्रीयश फडके, सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविला.विजेता विद्यार्थ्यांचा महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रताप पाटील यांचे हस्ते सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला. त्यानंतर प्रताप पाटील यांनी विजेता व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तसेच महाविद्यालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या पदवी व पदविका अभियांत्रिकीच्या कोर्सेसची माहिती देवून सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. 

          हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यकमाचे समन्वयक म्हणून प्रा.इंद्रजीत इनामदार,प्रा.वैभव रिसवडकर, प्रा.सागर चौगुले व प्रा.नानासाहेब काळे तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहिले.

            या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.श्रेया देशमुख व कु.मिनाक्षी राऊत यांनी केले. तरी आभार प्रदर्शन प्रा. वैभव रिसवडकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा