Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ८ जानेवारी, २०२४

निमगाव ( केतकी) येथे हिंदी राष्ट्रभाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्यांचा 20 जानेवारी 2024 रोजी बक्षिस वितरण चे आयोजन.

 


टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

             हिंदी राष्ट्रभाषा दिवस गुणगौरव समारंभ

ता. इंदापूर जिल्हा पुणे

हिंदी दिवस बक्षीस वितरण नियोजनाबाबत

 इंदापूर तहसील हिंदी अध्यापक संघाच्या वतीने बाबीर विद्यालय बाबीर येथे सहविचार सभा घेण्यात आली. 14 सप्टेंबर "हिंदी दिवस "निमित्त इंदापूर तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेतील प्रत्येक गटामधील तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्याबाबत नियोजन करण्यात आले. तालुक्यातील सेवानिवृत्त हिंदी विषय अध्यापकांचा गौरव करण्याचा कार्यक्रम घेण्याबाबत चर्चा झाली. तसेच हिंदी विषय अध्यापक यावर्षी पदोन्नती मिळून पर्यवेक्षक व मुख्याध्यापक झालेले आहेत त्यांच्याही सत्कार कार्यक्रम घेण्याबद्दल चर्चा झाली. 

     सदरील कार्यक्रम हा शनिवार दिनांक 20/01/2024 रोजी दुपारी 12.15 वाजता केतकेश्वर मंगल कार्यालय निमगाव (केतकी) येथे आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. अशी माहिती इंदापूर हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र रणमोडे सर यांनी दिली. सदर सभेस हिंदी अध्यापक संघातील महाराष्ट्र हिंदी कार्यकारणी सदस्य उस्मान मुलाणी, हिंदी अध्यापक संघाचे सचिव -के डी भोंग ,जिल्हा समन्वयक सुधाकर भोंग , कोषाध्यक्ष संजीव कुमार पांढरे, तसेच कार्यकारणी सदस्य गाढवे सर , वाघ सर ,चव्हाण सर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा