Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ८ जानेवारी, २०२४

माळखांबी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन...

 


टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

             शंकरराव मोहिते महाविद्यालय,व यशवंतराव मुक्त विद्यापीठ अकलूज याचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर माळखांबी येथे दिनांक 07जानेवारी ते 13 जानेवारी 2024 या कालावधी आयोजित केलेले आहे. या शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

     या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माळशिरस येथील नायब तहसीलदार अमोल कदम म्हणाले की,"विद्यार्थ्यांनी युवावस्थेत स्वतःला सिद्ध करावे.जीवनात कठोर परिश्रमाला पर्याय नाही.वेळ ही अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे,तीचा सदुपयोग करणारेच यशापर्यंत पोहोचू शकतात". या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे अध्यक्षीय मनोगतात बोलतांना म्हणाले की "विद्यार्थ्यांनी मन मनगट व मेंदू यांचा समन्वय साधून स्वतःचा विकास करावा."  

  ग्रामस्थांच्या वतीने स्वयंसेवकांचे स्वागत करताना उपसरपंच प्रभाकर गमे- पाटील म्हणाले की,"विद्यार्थ्यांनी शिबीराचा आनंद घ्यावा. गावकऱ्यांच्या वतीने सर्वांना चांगल्यासुविधा देण्याची आम्ही दक्षता घेऊ. 



या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बलभीम काकुळे यांनी, स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्तात्रय मगर यांनी तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉ.सज्जन पवार यांनी मानले.

यावेळी माळखांबी गावचे सरपंच सौ.मंगल पुजारी, उपसरपंच प्रभाकर तात्या गमे पाटील, बलभीम चव्हाण,भगवानराव गमे पाटील, गोविंदराव माने देशमुख, शिवाजीराव गमे पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राज गमे पाटील,उपाध्यक्ष धनाजी साठे, दीपक गमे पाटील बाळासाहेब वाघमारे, प्रमोद शेळके पाटील ,डॉ. बाळासाहेब मुळीक, कार्यक्रमाधिकारी प्रा. चंद्रकांत शिंदे, प्रा.स्मिता पाटील, माळखांबी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र क्षीरसागर, पाटीलसर,कांबळे सर,जायभय सर,जाधव सर,सौ. पवार मॅडम इत्यादीं.मान्यवर उपस्थित होते.

      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा