Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २८ जानेवारी, २०२४

भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन परीसरात ध्वजवंदन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व मिठाई वाटपाने संपन्न

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

          - भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन परीसरात ध्वजवंदन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व मिठाई वाटपाने संपन्न झाला. तसेच गावोगावी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, विद्यालयात ध्वजवंदन करून लहान मुलांना चॉकलेट, गोळ्यांचे वाटप, सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न करण्यात आला.

    टणू येथे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच वैभवी तेजस मोहिते यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शितल मोहिते, समीर बाळासाहेब मोहिते, उपसरपंच साधू देवकर, तेजस मोहन मोहिते, दिलीप लावंड, दिव्या जगताप, लतीका बोडरे, किशोर जगदाळे, देविदास बोडरे, मालन जगताप आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    गिरवी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पार्वती पांडुरंग डिसले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपसरपंच दादासाहेब क्षिरसागर, माऊली शिंदे, अनिल क्षिरसागर, आनंद ठोकळे, ग्रामसेवक बि. डी. मिसाळ, आशासेविका पुष्पा ठोकळे, सचिन चव्हाण आदींसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

   नरसिंहपूर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अर्चना नितीन सरवदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपसरपंच गुरूदत्त गोसावी, नरहरी काळे, विठ्ठल देशमुख, दशरथ राऊत, अश्विनी चंद्रकांत सरवदे, ग्रामसेवक महेश म्हेत्रे आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.

    पिंपरी बुद्रुक येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात अजिनाथ बोडके यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तर ग्रामपंचायत समोर सरपंच भाग्यश्री बोडके यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी श्रीकांत बोडके, ज्योती बोडके, पांडूदादा बोडके, ग्रामसेवक गणेश लंबाते, मुख्याध्यापक भारत कोरटकर, सुनिता शेंडगे, अनुराधा गायकवाड आदींसह ग्रामस्थ, पालक आदि मान्यवर उपस्थित होते. 


   नीरा नरसिंहपूर येथील चैतन्य विद्यालय व श्री सु.गो. दंडवते कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजवंदन शहीद जवान मेजर कुणाल गिरी गोसावी यांच्या मातोश्री वीर माता सौ वृंदा गिरी गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शि. प्र. मंडळ सदस्य धनंजय दुनाखे सर होते. यावेळी कार्यवाह श्रीकांत दंडवते, खजिनदार मगनदास क्षिरसागर आदि मान्यवर उपस्थित होते.

    गणेशवाड़ी जिल्हा परिषद शाळेत दशरथ काळे यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. 

फोटो - नीरा नरसिंहपूर येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंच अर्चना सरवदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा