संपादक----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
माळशिरस तालुका रास्त भाव स्वस्त धान्य दुकान व केरोसीन विक्री संघटनेची माळशिरस तहसिल कार्यालय येथे बैठक संपन्न झाली या प्रसंगी सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर माजी जिल्हाध्यक्ष बापू गदगे ,कायदेशीर सल्लागार ॲड. पठाण ,जिल्हा संपर्कप्रमुख नितीन पेंटर, जिल्हा सेक्रेटरी राज कटकम ,माळशिरस तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे मार्गदर्शक शिरीषभाई फडे, अमोल मेहता व सर्व रास्त भाव दुकानदार यांच्या उपस्थितीत होते
या वेळी माळशिरस तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या माळशिरस तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी दयानंद शेळके यांची निवड करण्यात आली तसेच माजी तालुकाध्यक्ष वैभव फडे यांची जिल्हा संघटक पदी व प्रकाश गायकवाड यांची सहसंघटक पदी निवड करण्यात आली तसेच तालुक्यातील अन्य पदाधिकारी पुढील प्रमाणे निवड करण्यात आल्या , तालुका कार्याध्यक्ष साजिद भाई सय्यद सहकार्याध्यक्ष बाळू भुसारे ,तालुका उपाध्यक्ष निलेश धोत्रे ,अकलूज सर्कल मधून माळशिरस सर्कल मधून सत्यवान वळकुदे ,नातेपुते सर्कल मधून विश्वास सिद्ध, खजिनदार- काका कुलकर्णी ,सचिव -राजेंद्र जाधव सर ,संघटक- ज्योतीताई कुंभार, प्रवक्ते -राणीताई बन्नपटे यांची निवड करण्यात आली यावेळी सर्व रास्त भाव दुकानदार आजी-माजी पदाधिकारी यांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा