टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
श्री गजानन शकुंतला कृष्णाजी पिसे हे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड शंकर नगर अकलूज येथे इंजीनियरिंग विभागाकडे मेकॅनिकल ड्राफ्ट्समन या पदावर कार्यरत असून महाराष्ट्रातील नामवंत संस्थानी त्यांचे सहकार ,सामाजिक, क्रीडा ,साहित्य व धार्मिक कार्याची दखल घेऊन कामगार भूषण ,लोक मित्रपुरस्कार ,राज्यस्तरीय क्रांतीसुर्य पुरस्कार ,महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार, दिव्यज्योती पंचरत्न पुरस्कार, व महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार सन 2019 असे आज अखेर विविध 18 पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेले आहे.
सन 1999 साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या शालेय मुलांच्या आनंदयात्रेचे ड्रॉइंग डिझाईन त्यांनी स्वतः डिझाईन केलेले होते. त्यांना दिपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मिरज यांच्याकडून माननीय श्री हरखचंद सावलासाहेब, जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्ट मुंबई यांचे शुभ हस्ते व मान्यवरांचे समवेत कामगाररत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा