संपादक ----हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची बैठक नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष धैर्यशील भैय्या पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे संपन्न झाली
महाराष्ट्रात आणि देशामध्ये राजकारणातला घसरलेला स्तर पातळी पाहता पुरोगामी विचारधारेवर चालणारे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि पद्मविभुषन लोकनेते खासदार .शरदचंद्र पवार यांच्यावरती निष्टा असणाऱ्यांची संख्या आजच्या वैचारिक पातळीच्या घसरलेल्या स्तरातील परिस्थीतीमध्ये सुध्दा पुरोगामी विचाराची कास घट्ट धरलेले नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने आहेत त्यामुळे समोरच्यां गटातील असोत किंवा अन्य कोणत्याही पक्षाच्या आमिषाला बळी न पडता निष्ठेने पक्ष संघटना वाढवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे कार्यकर्ते लाखोच्या संख्येत असून अशा कार्यकर्त्याची आवश्यकता असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष धैर्यशीलभैय्या पाटील यांनी व्यक्त केले तसेच,यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाच्या तुळजापूर तालुक्याची नवीन तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली ती पुढील प्रमाणे
तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग अध्यक्षपदी-" चंद्रकांत डावरे" तर तालुका कार्याध्यक्षपदी- "शहाजी कसबे" यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी विनोद साबळे तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी रावसाहेब वाघमारे, बाळु रणसुरे तालुका सरचिटणीस महादेव पंडागळे तालुका संघटक पदी किसन पंडागळे यांची नियुक्ती करण्यात आली.
या पदाधिकारी निवडी करिता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष तौफिक शेख, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिंदे, विधानसभा अध्यक्ष शिवाजी सावंत,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तुळजापूर शहराध्यक्ष अक्षय परमेश्वर,प्रभारी शहर कार्याध्यक्ष शरद जगदाळे, सोशल मीडिया चे जिल्हा अध्यक्ष अफसर मुल्ला, अल्पसंख्याक विभागाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष सिकंदर बेगडे, राजकुमार बोबडे,हनमंत गवळी, दादासाहेब पाटील, दत्ता डोके,बशीर पटेल,विकास सुरवसे,गौतम डावरे,मारूती पोटे,सुमित बनसोडे,सतीश माळी यांच्यासह तुळजापूर तालुक्यातील शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक जाधव यांनी केले तर सर्व उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांचे शहाजी कसबे यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा