इंदापूर तालुका..... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
निमसाखर एज्युकेशन सोसायटी संचलित एन .ई, एस
हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर ता. इंदापूर ,जि. पुणे, येथे आज राजमाता माँसाहेब जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंदांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे सचिव धनंजय रणवरे होते.. कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष संजय रणवरे हेदेखील उपस्थित होते. त्याचवेळी शालांतर्गत घेण्यात आलेल्या ,क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कबड्डी ,खो-खो, गोळा फेक, संगीत खुर्ची, स्लो सायकल, फुगा फोडणे, यासारख्या विविध सांघिक आणि वैयक्तिक खेळांचे बक्षीस वितरण मोठ्या थाटामाटा करण्यात आले. संपूर्ण बक्षीस वितरण हे प्रमुख अतिथी व संस्था पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी विजेते संघासाठी ट्रॉफी, प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तर वैयक्तिक खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हा सर्वच कार्यक्रम एकंदरीत अतिशय उत्साही व आनंददायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे, पर्यवेक्षक मधुकर शंकर खरात, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख चंद्रकांत बलभीम बोंद्रे या सर्वांनीच विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी ही उपस्थित होते
. याप्रसंगी विद्यालयातील अनेक मुलींची भाषणे झाली तसेच आपल्या विद्यालयातील मराठी विषयाचे तज्ञ प्राध्यापक सोमनाथ चौधरी सर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाचा जीवनपट उलगडून दाखवला. त्यावेळी माँसाहेब जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने राजे भोसले हायस्कूल ,जिंती ,तालुका करमाळा येथील शिवव्याख्याते व इंग्रजी विषयाचे प्राध्यापक रामहरी झांजुर्णे सर उपस्थित होते. आजच्या तरुणांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आदर्श घेतला पाहिजे. भरपूर व्यायाम व अभ्यास केला पाहिजे. नेहमी सर्वांनी सकारात्मक विचार केला पाहिजे. अभ्यासातील एकाग्रता वाढवली पाहिजे. कोणत्याही समाजविघातक आणि विरोधी गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपला देश बलशाली बनेल. राजमाता जिजाऊंच्या विचारांचा वारसा आजच्या उपस्थित युवतीने अंगी बाळगला पाहिजे व एक सदृढ व सक्षम महिला म्हणून विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविला पाहिजे, निर्भयपणे व धाडसाने आजच्या समाजामध्ये वावरले पाहिजे आणि राजमाता जिजाऊंच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे असे मत त्यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले. उठा, जागे व्हा, व ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका. हा स्वामी विवेकानंदांचा महामंत्रण सर्व युवकांनी स्मरणात ठेवला पाहिजे असे मत त्यावेळी रामहरी झांजुर्णे
सरांनी व्यक्त केले. संस्थेचे विद्यमान सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या विद्यालयाने उत्तुंग भरारी घेतली पाहिजे, विविध खेळाच्या माध्यमातून खेळाडूंनी आपल्या एन , ई ,एस ,हायस्कूलचे नाव उंचविण्याचा अतोनात प्रयत्न केला पाहिजे, सर्व खेळाडूंना तशा प्रकारचे पोषक वातावरण निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. आजच्या मिळालेल्या बक्षीसातून अनेक खेळाडूंनी प्रेरणा घेतली खेळाबरोबरच अभ्यासाकडे देखील लक्ष दिले पाहिजे. आपल्यासाठी , आई-वडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज झाले पाहिजे आपण सर्वांनी निरोगी व आनंद राहिले पाहिजे. त्यासाठी राजमाता जिजाऊसाहेब यांनी सर्व समाजासाठी केलेलं महान कार्य आपण विसरता कामा नये, एक मुलगी शिकली तर संपूर्ण घराची प्रगती होते, सुंदर संस्कार कुटुंबावर केले जातात, म्हणून सक्षम आणि संस्कारक्षम पिढी बनण्यासाठी राजमाता जिजाऊ साहेबांचा आदर्श सर्वांनी मनाशी बाळगला पाहिजे. स्वामी विवेकानंदांचे विचार हे फक्त आपल्या देशाची महान संस्कृती सांगण्यापुरतेच मर्यादित नव्हते तर संपूर्ण जगापुढे आदर्श निर्माण करून देण्याची ताकद त्यांच्या विचारांमध्ये होती. आजच्या तरुणांनी स्वामी विवेकानंदांच्या चरित्रांचे पारायण केले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने बलशाली राष्ट्र निर्माण होऊ शकते असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. त्यावेळी सचिव यांनी या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन नियोजन सांस्कृतिक विभागाने केले. क्रीडा शिक्षक प्रमोद ज्ञानदेव चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकारी व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सुञ संचलन आजिनाथ मलगुंडे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा