अकलुज ----प्रतिनिधी
शकुर तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदाशिवराव माने विद्यालयामध्ये राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.यावेळी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य इकबाल काझी जेष्ठ साहित्यीक विरेंद्र पत्की उपस्थित होते.
इयत्ता सातवी मधील प्राजक्ता लोंढे हिने राजमाता जिजाऊ व राजविर शिंदे याने स्वामी विवेकानंद यांची व्यक्तिरेखा साकारली होती. याप्रसंगी दिव्यांका कोल्हे हिने विचार व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक अमोल फुले,उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे,उपप्राचार्य संजय शिंदे,व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व विभागाचे पर्यवेक्षक,शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
सातवीचे वर्गशिक्षक संदिप शिंदे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सूत्रसंचालन पोपट पवार यांनी केले तर दत्तात्रय घंटे यांनी आभार मानले...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा