Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३ जानेवारी, २०२४

कोल्हापूर करांचे नवीन वर्षाचे स्वागत शांतता दौडने

 



अकलूज प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी.

          अव्यहातपणे गेली ११ वर्षपासुन सिटीजन फोरम आणि वाय.एम. सी.ए.कोल्हापूर तर्फे आयोजित "रन फॉर पिस"(शांतता दौड) ने नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.

        त्यानुसार यावर्षीही सिटीझन फोरम द्वारे १ जानेवारी २०२४ रोजी शांतता दौडचे आयोजन केले होते.त्याप्रमाणे वाईल्डर मेमोरियल चर्च,सासणे ग्राउंड न्यू शाहूपुरी येथून सकाळी ६:४५ वाजता दौड सुरू झाली.यामध्ये अठरापगड जातीचे लोक राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून सहभाग घेतला होता आणि या माध्यमातून देशबांधवांना समतेचा संदेश देऊन निरोगी भारत,राष्ट्रीय आरोग्य व राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे सर्व भारतीय बांधवांना आव्हान करण्यात आले. 

         सुरवातीला फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव यांनी नियोजना हेतू आणि उद्देश सांगताना सध्या सामाजिक असंतोषाचे वातावरण होत असताना समाज वितुष्टाच्या जोखडात अडकत आहे म्हणून आम्ही मात्र समाजात समता, बंधूंता आणि विश्व शांतीचा संदेश समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेवून नववर्षाच्या सुरुवातीलाच सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहे तसेच सर्व देश बांधवांचे व आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी राखूया असे आवाहन केले यावेळी चला निरोगी भारत घडवू या चा नारा देण्यात आला.

        वायल्डर मेमोरियल चर्च येथे डेनियल धनवडे ह्यांनी विश्वशांती करीता प्रार्थना केली .

तसेच त्यानंतर ही दौंड रेल्वे स्टेशन मारुती मंदिर-येथे आली तेथे सर्वांना आरोग्य आणि सामाजिक समतेची प्रार्थना संजयसिंह साळोखे आणि राहूल फल्ले प्रार्थना केली.दौंड शाहुपुरी बडी मशिद- येथे गेल्यावर फारूख कुरेशी चाचा ह्यांनी संयम,समता,बंधुता करीता प्रार्थना केली.शेवटी यावेळी आयबीएमचे राष्ट्रीय कोच विवेक रणवरे सर ह्यांनी व्यसनमुक्ती आणि सर्व व्यसनापासून दूर राहण्याची सर्वांना शपथ दिली. 

           यावेळी वैभवराज राजे- भोंसले,वाय.एम.सी.एसचे जॉन भूतेलो,अतुल रूकडईकर,अभय वेंगुर्लेकर,अतुल जाधव,वकील बार असोसिएशनचे ॲड.राजेंद्र चव्हाण,ॲड.विजय ताटे-देशमुख,ॲड.रविंद्र जानकर,ॲड.सुस्मित कामत,ॲड.बी.एम.पाटील,

किशोर घाटगे,डॉ.मिलिंद वानखेडे,डॉ.नायकवडी, 

संग्राम पाटील कौलवकर, परिवर्तनचे अमोल कुरणे,समीर शेख,अजित पाटील,जी.एस. पाटील,संजय गेंजगे,अजित नलवडे,किरण आतिग्रे,राष्ट्रवादीचे महादेवराव पाटील,मनसेचे राजू जाधव,प्रमोद दाभाडे,अनिल पवार,किशोर ढवंग,रोहित शिंदे, गौरव लांडगे,संजय पाटील,सागर पाटील,अनिकेत,सागर माळी, श्रीधर पाटील,मिलिंद मुधाळे इ उपस्थित होते.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा