उपसंपादक : नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग, अकलूज प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन "जयोत्सव" २०२३-२४ संपन्न झाला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी .विनायक गुळवे तसेच प्रशाला समितीचे सदस्य,प्रशालेच्या मुख्याध्यापिका.शेख मॅडम उपस्थित होत्या.प्रथमतः प्रमुख पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.त्यानंतर सर्व मान्यवर रंगमंचावर स्थानापन्न झाले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहकार महर्षि कै. शंकरराव मोहिते पाटीह ( काकासाहेब )व कै. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील (आक्कासाहेब) यांच्या प्रतिमेचे समोर दीपप्रज्वलन , पूजन करुन अभिवादन करण्यात आले. आणि सहकार महर्षि काकासाहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करुन महर्षि गीत सादर झाले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
त्यानंतर इयत्ता ३ री व इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्याचे सादरीकरण केले.यामध्ये देशभक्तीपर गीत,बालगीत, शेतकरी गीत,कोळीगीत,गोंधळी गीत असे विविध नृत्य प्रकारांचे उत्कृष्ठरित्या सादरीकरण केले.त्यानंतर झालेल्या गीतांचे बक्षीस वितरण करण्यात आले.त्यामधून प्रथम,द्वितीय व तृतीय असे क्रमांक देण्यात आले.यावेळी समूहनृत्य सादरीकरणाचे परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून लाभलेले डॉ अपर्णा कुचेकर मॅडम,.औदुंबर सूर्यकांत भिसे सर,सोनल नारायणकर मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .प्रदीप मिसाळ सर व .गिरीश सूर्यवंशी सर यांनी केले.शेवटी सारे जहाँ से अच्छा या समूहगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
दि.०१,०२ व ०३ जानेवारी रोजी "जयोत्सव" वार्षिक स्नेहसंमेलन २०२३-२४ मोठ्या उत्साहात व निर्विघ्नपणे पार पडले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पालक,विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी मोलाचे योगदान दिले. सदर कार्यक्रम प्रशालेच्या मुख्याध्यापिका कु.शेख मॅडम यांच्या मार्गदर्शनखाली संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा