Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ३ जानेवारी, २०२४

रावबहाद्दूर गट (बिजवडी)येथे "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले" यांची जयंती उत्साहात साजरी.

 


अकलूज प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी.

                जि. प. प्राथमिक शाळा,रावबहाद्दूर गट ( बिजवडी ) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 'बालिका दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.



        क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या एक थोर भारतीय समाजसुधारक, शिक्षण तज्ज्ञ आणि पहिल्या शिक्षका होत्या. त्यांनी भारतातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तसेच महिला व मुलींना शिक्षण देण्याचे काम केले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समवेत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाई फुले यांनी भारतीय महिला सबलीकरणाचे कार्य केले. त्यांच्या या कार्याची जाणीव येणाऱ्या सर्व पिढीला होणे गरजेचे आहे म्हणून त्यांच्या संपूर्ण जीवन कार्याची माहिती मुख्याध्यापक . श्रीकांत राऊत सर यांनी दिली. बालिका दिनानिमित्त शाळेमध्ये संगीत खुर्ची, लिंबू चमचा, तीन पायांची शर्यत अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यानिमित्ताने उद्योजक योगेश (भैय्या) गांधी यांनी मुलांना तीन डझन वह्या दिल्या.

           याप्रसंगी शालेय व्य


वस्थापन समिती उपाध्यक्ष सौ. दिपाली लोखंडे, रोहिणी बंडलकर, वंदना भजनावळे, अश्विनी गरुड, मालन जगताप व शिक्षणप्रेमी महिला उपस्थित होत्या. बिजवडी गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज तात्या शिंदे यांच्या वतीने मुलांना वडापाव व जिलेबीचे वाटप करण्यात आले. शेवटी सहशिक्षक अजमीर फकीर सर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा